लंडन : वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ८९ रननी विजय झाला. या ऐतिहासिक मॅचसाठी वापरण्यात आलेल्या बॉलचा लिलाव झाला आहे. २,१५० डॉलर म्हणजेच १.५० लाख रुपयांना या बॉलचा लिलाव झाला. याचबरोबर या मॅचमध्ये टॉससाठी वापरण्यात आलेलं नाणं स्कोअरशीट यांचाही लिलाव करण्यात आला. टॉससाठी वापरण्यात आलेल्या नाण्याला १,४५० डॉलर म्हणजे जवळपास १ लाख रुपये आणि स्कोअरशीटचा १,१०० डॉलर(७७ हजार रुपये)ला लिलाव झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या ऑफिशियलमेमोराबिला डॉट कॉम या वेबसाईटवर लिलाव सुरु आहे. या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला विकत घ्यायची वस्तू निवडावी लागेल. पेमेंट ऑप्शनची निवड केल्यानंतर आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता द्यावा लागणार आहे. काहीच दिवसांमध्ये तुम्ही विकत घेतलेली वस्तू तुमच्या घरी येईल.


मास्टरकार्ड, विजा यांच्या माध्यमातून तुम्ही या वस्तू विकत घेऊ शकता. या वेबसाईटवर रिटर्न आणि एक्सचेंजच्या अटी आणि शर्ती लिहिण्यात आलेल्या आहेत. आयसीसी या वेबसाईटची अधिकृत पार्टनर आहे, त्यामुळे या वेबसाईटवर लिलावात दिल्या जाणाऱ्या वस्तू या खरोखरच वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये वापरल्या गेल्या आहेत.


या वेबसाईटवर भारताच्या मॅचमध्ये वापरलेल्या २७ वस्तू (बॉल, नाणी, स्कोअरशीट) लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. पण यातल्या ३ वस्तूच आता लिलावासाठी शिल्लक आहेत. भारताने या वर्ल्ड कपमध्ये ९ मॅच खेळल्या, यातल्या ८ मॅच पहिल्या फेरीत आणि १ मॅच सेमी फायनलमधली होती.


सेमी फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून १८ रननी पराभव झाला. या मॅचमध्ये वापरण्यात आलेल्या बॉलची बेस प्राईज ८५० डॉलर (५९,५०० रुपये), टॉससाठी वापरण्यात आलेलं नाणं ३५० डॉलर (२४,५०० डॉलर) आणि स्कोअरशीट ४०० डॉलर (२८,००० रुपये) ठेवण्यात आली आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला होता. या मॅचसाठी वापरण्यात आलेला बॉल ६०० डॉलर (४२,००० रुपये) ला विकला गेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या मॅचमध्ये वापरण्यात आलेल्या वस्तूंची बेस प्राईज सर्वाधिक ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर भारत-ऑस्ट्रेलिया मॅचमधल्या वस्तू होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला होता.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचसाठी वापरण्यात आलेला बॉल १,०५० डॉलर (७३,५०० रुपये), स्कोअरशीट ४५० डॉलर (३१,५०० रुपये), टॉसचं नाणं ५०० डॉलर (३५,००० रुपये) ना विकलं गेलं. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी वापरलेल्या बॉलची किंमत ९०१ डॉलर (६३,००० रुपये) ठेवण्यात आली होती. हा बॉलही आता विकला गेला आहे.