साऊथम्पटन : अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा ११ रननी निसटता विजय झाला. या मॅचमध्ये एमएस धोनीने ५२ बॉलमध्ये २८ रन केले. या संथ खेळीमुळे धोनीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. पण या मॅचमध्ये धोनीच्या नावावर नकोसं रेकॉर्डही झालं आहे. २०११ नंतर धोनी पहिल्यांदाच स्टम्पिंग झाला. रशिद खानच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारण्यासाठी धोनी क्रिजबाहेर आला, तेव्हा अफगाणिस्तानचा विकेट कीपर इक्रम अली खीलने त्याला स्टम्पिंग केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमावून २२४ रन केले. ५० ओव्हरमध्ये टीम इंडियाचा २०१० नंतरचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. 


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने या मॅचमध्ये ६३ बॉलमध्ये ६७ रनची खेळी केली. पण विराट वगळता दुसऱ्या बॅट्समनना या मॅचमध्ये संघर्ष करावा लागला. केदार जाधवने ६८ बॉलमध्ये ५२ रनची खेळी केली. 


मोहम्मद नबीने अफगाणिस्तानला या आव्हानाच्या जवळ पोहोचवलं होतं. पण शेवटच्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने हॅट्रिक घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने ५५ बॉलमध्ये सर्वाधिक ५२ रनची खेळी केली.


या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एकाही मॅचमध्ये पराभव झालेला नाही. या स्पर्धेत खेळलेल्या ५ पैकी ४ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, तर एका मॅच पावसामुळे रद्द झाली. पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया ९ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.