चेस्टर ले स्ट्रीट : वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रननी पराभव केला आहे. याचबरोबर इंग्लंडने वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही प्रवेश केला आहे. न्यूझीलंडचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी त्यांचाही सेमी फायनलचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडने दिलेल्या ३०६ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा १८६ रनवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर क्रिस वोक्स, जोफ्रा आर्चर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद आणि बेन स्टोक्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. न्यूझीलंडकडून टॉम लेथमने सर्वाधिक ५७ रनची खेळी केली.


या मॅचमध्ये इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ५० ओव्हरमध्ये ३०५/८ एवढा स्कोअर केला. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी पुन्हा एकदा इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांमध्ये १२३ रनची पार्टनरशीप झाली. जेसन रॉय ६० रन करुन आऊट झाला. पण बेयरस्टोने त्याचं लागोपाठ दुसरं शतक पूर्ण केलं. बेयरस्टोने ९९ बॉलमध्ये १०६ रन केले. याआधी भारताविरुद्धच्या मॅचमध्येही बेयरस्टोने शतकी कामगिरी केली होती.