World Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा रेकॉर्ड, विराटचा विक्रम थोडक्यात हुकला
वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये हाशिम आमलाने विक्रमाला गवसणी घातली आहे.
एजबेस्टन : वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये हाशिम आमलाने विक्रमाला गवसणी घातली आहे. हाशिम आमलाने वनडे क्रिकेटमध्ये ८ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. या मॅचमध्ये अमलाने ८३ बॉलमध्ये ५५ रनची खेळी केली. न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ८ हजार रन करणारा आमला हा दुसरा खेळाडू ठरला आहे. आमलाने १७६ इनिंगमध्ये ८ हजार रनचा टप्पा गाठला. अमलाची वनडे कारकिर्दीतली ही १७९वी मॅच आहे.
वनडेमध्ये सगळ्यात कमी इनिंगमध्ये ८ हजार रनचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने २ वर्षांपूर्वी १५ जून २०१७ ला बांगलादेशविरुद्ध हा टप्पा ओलांडला होता. विराटला ८ हजार रन पूर्ण करायला १७५ इनिंग लागल्या होत्या. फक्त २ इनिंगमुळे अमलाचा सगळ्यात जलद ८ हजार रन पूर्ण करण्याचा विक्रम हुकला आहे.
विराट कोहलीने नुकताच वनडे क्रिकेटमध्ये ११ हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ११ हजार रन करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावावर झाला आहे.