नॉटिंगघम : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधला सामना पावसामुळे रद्द झाला. पण याचबरोबर जून महिन्यातलं एक रेकॉर्ड अजूनही कायम राहिलं. या दोन्ही टीममध्ये जून महिन्यात झालेली एकही मॅच न्यूझीलंडने गमावली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड या टीममध्ये गेल्या ४४ वर्षांमध्ये १०६ मॅच खेळवल्या गेल्या आहेत. यातल्या ५ मॅच या जून महिन्यात खेळवल्या गेल्या आहेत. या ५ पैकी ३ मॅच न्यूझीलंडने जिंकल्या आहेत. तर १ मॅच अनिर्णित राहिली होती आणि १ मॅच रद्द करण्यात आली. टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध जूनमध्ये ज्या सामन्यांमध्ये पराभव झाला त्या सगळ्या मॅच वर्ल्ड कपच्या होत्या. १९७५, १९७९ आणि १९९९ वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला. या सगळ्या मॅच जूनमध्ये आणि इंग्लंडमध्येच खेळवल्या गेल्या होत्या.


भारत आणि न्यूझीलंड या १०७व्यांदा एकमेकांसमोर होत्या. यातल्या ५५ मॅचमध्ये भारताचा आणि ४५ मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला. तर वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने ४ वेळा टीम इंडियाला पराभूत केलं, तर टीम इंडियाने ३ वेळा न्यूझीलंडला धूळ चारली.


१) वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदा १९७५ साली करण्यात आले. टीम इंडिया आणि न्यूझीलंड या टीममधील पहिली मॅच या वर्ल्ड कपमध्येच खेळण्यात आली. ही पहिली पहिली मॅच १४ जून १९७५ साली खेळली गेली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा ४ विकेटने पराभव झाला.


२) दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत म्हणजेच १९७९ साली टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये लढत झाली. हा सामना १३ जून १९७९ ला खेळण्यात आला. या सामन्यात भारताचा ८ विकेटने पराभव झाला.


३) या दोन्ही टीम १९९९ च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा समोरासमोर आल्या. यावेळी टीम इंडियाने किवींना विजयासाठी २५२ धावांचे आव्हान दिले होते. किवींनी हे आव्हान ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले होते. त्यामुळे टीम इंडियाचा ५ विकेटने पराभव झाला होता.