लंडन : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. वर्ल्ड कपला अवघे काही दिवस शिल्लक असताना इंग्लंडने त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत. ऑलराऊंडर जोफ्रा आर्चर, डावखुरा स्पिनर लियाम डॉसन आणि जेम्स विन्स यांना संधी देण्यात आली आहे. २९ वर्षांच्या डॉसनने काऊंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळताना चांगली कामगिरी केली, यामुळे त्याची निवड करण्यात आली. डॉसनने काऊंटी क्रिकेटमध्ये १८ विकेट घेतल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही खेळाडूंना जो डेन्ली, डेव्हिड विली आणि ऍलेक्स हेल्स यांच्याऐवजी संधी मिळाली आहे. उत्तेजनार्थ औषधं घेतल्याप्रकरणी आधीच ऍलेक्स हेल्सवर बंदी घालण्यात आली होती.


वर्ल्ड कपसाठी इंग्लंडची टीम


इयोन मॉर्गन (कर्णधार), जॉस बटलर, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, टॉम कुरन, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जेम्स विन्स, क्रिस वोक्स, मार्क वूड