World Cup 2019 : `इंग्लंडमध्ये नको, दुष्काळी महाराष्ट्रात बरस`; केदार जाधवची पावसाला साद
राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी क्रिकेटपटू केदार जाधवनं वरुणराजाला आर्त साद घातली आहे.
नॉटिंगहम : राज्यातील दुष्काळ दूर व्हावा यासाठी क्रिकेटपटू केदार जाधवनं वरुणराजाला आर्त साद घातली आहे. सध्या इंग्लडंमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पावसानं चांगलाच विचका केला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात भीषण दुष्काळ आहे. म्हणूनच टीम इंडियाचा भाग असलेला महाराष्ट्राचा खेळाडू केदार जाधवनं निसर्गाला ही साद घातली.
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधला तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या मॅचमध्येही पावसाचं सावट आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाच्या सुरुवातीच्या बॅट्समननी चांगली कामगिरी केल्यामुळे केदार जाधवला बॅटिंगची संधी मिळाली नाही.