नवी दिल्ली : क्रिकेट वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्या मॅचआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून या शुभेच्छा दिल्या. 'टीम इंडिया या वर्ल्ड कप स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, तसेच टीमकडून चांगला खेळ आणि खिलाडूवृत्ती पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी  व्यक्त केला. खेळा आणि कामगिरीने क्रिकेट चाहत्यांची मनंदेखील जिंका', असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


पंतप्रधान मोदी नेहमीच मोठ्या स्पर्धांआधी भारतीय खेळाडूंना ट्विटद्वारे आगामी शुभेच्छा देत असतात. तसेच अनेक खेळाडूंच्या भेटीगाठीही घेत असतात.   


दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच झाल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधील आपली दुसरी मॅच ९ जून रोजी खेळणार आहे. ही  मॅच गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली जाणार आहे. याआधी टीम इंडियाने  १९८३ आणि २०११ साली वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे. टीम इंडियाला यंदाचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा क्रिकेट चाहत्यांना असणार आहे.