बर्मिंघम : टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार`? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून कर्णधार विराट कोहली, टीम प्रशासन आणि निवड समितीला पडला. अगदी वर्ल्ड कपला सुरुवात झाली तरी चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार यावर गोंधळ सुरुच होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही मॅचसाठी केएल राहुल चौथ्या क्रमांकावर आला. पण शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे केएल राहुलला ओपनिंगला यावं लागलं. यानंतर विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळायला मिळालं. पण विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतला संधी मिळाली. 


इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये ऋषभ पंतने ३२ रनची तर बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये ४८ रनची खेळी केली. या दोन्ही इनिंगमध्ये ऋषभ पंतने केलल्या खेळी युवराज सिंगच्या पसंतीस उतरली आहे. 'भविष्यासाठी टीम इंडियाला चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणारा खेळाडू मिळाला आहे. ऋषभ पंतवर योग्य गुंतवणूक करा आणि त्याला तयार करा,' असं ट्विट युवराज सिंगने केलं आहे. 



२०१५ वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाने चौथ्या क्रमांकावर अनेक खेळाडूंना संधी दिली. या क्रमांकावर २०१५ वर्ल्ड कपनंतर युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, एमएस धोनी, अंबाती रायुडू, मनोज तिवारी, विजय शंकर, ऋषभ पंत, विराट कोहली, केएल राहुल, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, केदार जाधव या खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर संधी दिली. पण कोणत्याच खेळाडूला चमक दाखवता आली नाही.