ओव्हल : वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता ३५५ सिक्स आहेत. तर धोनीने ३५४ सिक्स मारले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित आणि शिखर धवनने टीम इंडियाला जबरदस्त सुरुवात करून दिली. रोहित आणि शिखर यांच्यामध्ये १२७ रनची पार्टनरशीप झाली. रोहित शर्मा ७० बॉलमध्ये ५७ रन करुन आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ५२० सिक्सर लगावले आहेत. तर शाहिद आफ्रिदीने ४७६ आणि ब्रेन्डन मॅक्कलमने ३९८ सिक्स मारले. या यादीमध्ये रोहित चौथ्या आणि धोनी पाचव्या क्रमांकावर आहे.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित शर्माने झुंजार शतकी खेळी केली होती. रोहितच्या या शतकामुळे टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच मॅच जिंकली होती.


याचबरोबर रोहित शर्माने या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांनाही मागे टाकलं आहे. रोहित शर्माने सचिन आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सगळ्यात जलद २ हजार रनचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३८ इनिंगमध्ये २ हजार रन पूर्ण केले. हे रेकॉर्ड करण्यासाठी सचिनला ५१ इनिंग आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांना ४५ इनिंग लागल्या होत्या. या मॅचमध्ये रोहितला २ हजार रनचा टप्पा ओलांडण्यासाठी २० रनची गरज होती. 


p>