सचिन तेंडुलकरचा सोळा वर्षे जुना हा रेकॉर्ड अबाधितच
या सर्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड अबाधितच राहीला आहे.
लंडन : आयसीसी वर्ल्ड कप 2019 ची फायनल ही अविश्वसनीय आणि रोमाचंक अशी ठरली. अटीतटीच्या या सामन्यात इंग्लडचा संघ जगज्जेता ठरला. या वर्ल्डकपमध्ये खूप सारे रेकॉर्ड बनले. पण या सर्वात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड अबाधितच राहीला आहे. या वर्ल्डकपमध्ये सचिनचा सोळा वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड तुटेल असे वाटले होते पण तसे घडले नाही.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम यंदाही अबाधित राहिला आहे. सचिनने २००३च्या विश्वचषकात ६७३ धावा चोपल्या होत्या. सचिनच्या १६वर्षापूर्वीच्या या विक्रमाच्या जवळपास अनेक खेळाडू पोहोचले. मात्र तो मोडण्यात त्यांना अपयश आले. सचिनच्या या विक्रमाच्या सर्वात जवळ टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पोहोचला होता.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन विलियम्सन आणि इंग्लडच्या जो रुटला सचिनचा रेकॉर्ड तोडण्याची संधी होती. पण दोघेही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. सचिनचा 673 धावांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी विलियम्सनला आणखी 126 धावांची गरज होती. पण ऐतिहासिक लॉर्ड्सवर तो तीस रन्सच बनवू शकला. विलियम्सनच्या नावे या वर्ल्डकपमध्ये 10 सामन्यात 578 रन्स बनले. सचिनने 2003 वर्ल्डकपमध्ये 11 सामन्यात 61.18 च्या सरासरीने 673 रन्स केले होते. यामध्ये सहा अर्धशतक आणि एक शतक होते.152 हा सचिनचा सर्वोत्तम स्कोअर राहीला.