साऊथम्पटन : अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने एक बदल केला आहे. भुवनेश्वर कुमारला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्याऐवजी मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. धवनऐवजी ऋषभ पंतची १५ सदस्यीय टीममध्ये निवड करण्यात आली. यामुळे ऋषभ पंतला टीममध्ये जागा मिळेल असं बोललं जात होतं, पण विराटने हा बदल न करता विजय शंकरवर विश्वास दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करुन मोठी धावसंख्या उभारायची आणि नंतर अफगाणिस्तानला लवकर ऑलआऊट करण्याचं आव्हान टीम इंडियापुढे असेल. ही मॅच मोठ्या फरकाने जिंकल्यास टीम इंडियाचा नेट रनरेट वाढेल.


वर्ल्ड कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या ४ पैकी ३ मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला तर न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली. अफगाणिस्तानविरुद्धची मॅच जिंकल्यास टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर जाईल.


टीम इंडिया


लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), विजय शंकर, एमएस धोनी (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, केदार जाधव, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह


अफगाणिस्तानची टीम 


हजरतुल्ला झझाई, गुलबबादीन नायब (कर्णधार), रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, अजगर अफगाण, मोहम्मद नबी, इरकम अली खिल (विकेट कीपर), नजीबुल्लाह झदरान, राशीद खान, अफताब आलम, मुजीब उर रहमान