मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया २२ मेरोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. भारताआधी काही टीम आधीच इंग्लंडला पोहोचल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडिया २२ मे ला सकाळी  इंग्लंडसाठी निघेल. वर्ल्डकप साठी १५ सदस्यीय टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. परंतु या वेळेस टीम इंडियाचे १४ खेळाडूच रवाना होतील. तर केदार जाधव जाणार की नाही याबद्दल अजूनही ठामपणे सांगता येत नाही.


टीम इंडिया वर्ल्डकपमधील पहिली मॅच ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.


वर्ल्ड कप स्पर्धेला जरी ३० मे पासून सुरुवात होत असली, तरी प्रत्येक टीम कसून सराव करत आहेत. टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही दिवसांआधी २ सराव सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेश या टीम विरुद्ध हे सराव सामने खेळले जाणार आहेत.


यंदाच्या वर्ल्ड कप हा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. त्यामुळे प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहे. म्हणजेच प्रत्येक टीमच्या ग्रुप स्टेजमध्ये ९ मॅच होणार आहेत. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील.


१४ जुलैला लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड कपची फायनल खेळवली जाईल. ९ जुलै आणि ११ जुलैला दोन सेमी फायनल होणार आहेत.


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


९ जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका