दुबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेल्या टीमची यादी प्रत्येक देशाला २३ एप्रिलपर्यंत आयसीसीला द्यावी लागणार आहे. या यादीमधल्या एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर २३ मेपर्यंत खेळाडू बदली करता येणार आहे. न्यूझीलंडच्या टीमने सगळ्यात आधी त्यांची वर्ल्ड कपसाठीची १५ सदस्यांची टीम जाहीर केली आहे. वर्ल्ड कपसाठीची टीम निवडण्याची तारीख आता जवळ आली असली, तरी भारताची चौथ्या क्रमांकाची समस्या अजूनही कायम आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताकडून चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिली मॅच ३० जूनला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होईल, तर वर्ल्ड कपची फायनल १४ जुलैला खेळवली जाईल. भारताचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.


ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या १० टीम वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहेत. या १० टीम एकमेकांविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये खेळतील. ग्रुप स्टेजमध्ये एकूण ४५ मॅच होतील. ग्रुप स्टेजमधल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये जातील.


वर्ल्ड कपमधल्या भारताच्या मॅच


५ जून- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका


१३ जून- भारत विरुद्ध न्यूझीलंड


१६ जून- भारत विरुद्ध पाकिस्तान


२२ जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान


२७ जून- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज


३० जून- भारत विरुद्ध इंग्लंड


२ जुलै- भारत विरुद्ध बांगलादेश


६ जुलै- भारत विरुद्ध श्रीलंका


वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधल्या सगळ्या मॅच या भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील. स्टार स्पोर्ट्सकडे वर्ल्ड कप मॅचच्या प्रसारणाचे अधिकृत अधिकार आहेत. तर मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर बघता येईल.