साऊथम्पटन : टीम इंडिया वर्ल्डकपमधील आपली पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीला वर्ल्ड कपमधील अनोखा रेकॉर्ड करण्याची संधी आहे. कोहलीचा यंदाचा वर्ल्ड कप हा खेळाडू म्हणून तिसरा तर कॅप्टन म्हणून पहिलाच वर्ल्डकप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने आपल्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप २०११ साली खेळला होता. कोहलीने आज (५ जून) साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये जर शतकी कामगिरी केली तर त्याच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद होईल.


काय आहे रेकॉर्ड?


कोहलीने याआधी २ वर्ल्ड कप खेळले आहे. या दोन्ही वर्ल्ड कपच्या टीम इंडियाच्या पहिल्या मॅचमध्ये विराटने शतकी कामगिरी केली आहे. कोहलीने २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये बांग्लादेशविरुद्ध शतक ठोकले होते. तर २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिली मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यात आली होती. या मॅचमध्येही कोहलीने दमदार शतक ठोकले. कोहलीने बांगलादेश विरुद्ध १०० तर पाकिस्तान विरुद्ध १०७ रन केल्या होत्या.


जर विराटने आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आजच्या पहिल्या मॅचमध्ये शतक ठोकले तर हा रेकॉर्ड ठरेल. तसेच त्याची ही अनोखी शतकांची हॅट्रिक ठरेल. कोहलीने जर शतक ठोकले तर अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरेल.


वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने २२७ मॅचमध्ये ४१ शतकं लगावली आहेत. सर्वाधिक शतकं करण्याचं रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये ४९ शतकं केली. विराट जर या वेगानेच खेळत राहिला, तर वनडे मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड लवकरच मोडित काढेल, यात शंका नाही.