World Cup 2023 Afghanistan Beat Pakistan Babar Azam Slow Innings: पाकिस्तानच्या संघाला 8 विकेट्स राखून पराभूत करत अफगाणिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा धक्का दिला आहे. स्पर्धेतील 22 व्या सामन्यामध्ये अनपेक्षित विजय मिळवणाऱ्या अफगाणिस्तानने 15 ऑक्टोबर रोजी विद्यमान विजेता संघ असलेल्या इंग्लंडलाही धूळ चारली होती. चेन्नईमधील मैदानामध्ये पाकिस्तानी संघाला धूळ चारल्यानंतर अफगाणिस्तानी संघावर कौतुकाचा तर पाकिस्तानच्या संघावर टीकेचा वर्षाव होत आहे. असं असतानाच पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. 282 धावा केल्यानंतरही अफगाणिस्तानचा संघ केवळ 2 विकेट गमावून 283 धावांचं लक्ष्य पूर्ण करतो हे आश्चर्यकारक असल्याचं अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे. मात्र असं असतानाच एका माजी क्रिकेटपटूने पाकिस्तान हा सर्वच बाबतीत सर्वात वाईट संघ असून बाबर आझमवरही गंभीर आरोप केले आहेत.


बाबरची संथ खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरने 72 धावांची खेळी केली. मात्र बाबरची ही फारच संथ होती. बाबर वगळता अबदुल्ला शफीकच्या 58 धावा, शादाब खानच्या 40 धावा आणि इफ्तिकार अहमदच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 282 धावांपर्यंत मजल मारली. बाबरने सेट होण्यासाठी बरेच चेंडू खर्च केल्यानंतर संघाला फटकेबाजीची गरज असताना मोक्याच्या क्षणी तो बाद झाल्याने पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 283 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या रेहमनुतुल्ला गुरबाझने 65 धावा आणि इब्राहिम झार्दानने 87 धावा करत उत्तम सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची पार्टनरशीप केली. त्यानंतर रेहमत शाहने नाबाद 77 आणि हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 48 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. 9 दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभवाचा धक्का दिला आहे.


 नक्की वाचा >> 'रोज 8-8 किलो मटण खाता तरी...'; संतापलेल्या वसीम अक्रमने पाकिस्तानी संघाचं खाणंच काढलं


पाकिस्तानची शाब्दिक धुलाई


पाकिस्तानच्या याच सुमार कामगिरीचा समाचार न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या कॉमेंटेटर म्हणून काम करणाऱ्या सायमन डलने घेतला आहे. सायमनने पाकिस्तानी संघावर कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. पाकिस्तानी संघ तुलनेनं दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध पराभूत झाल्यानंतर सायमनने आपल्या जुन्या टीकेचा संदर्भ देत पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांबरोबरच पाकिस्तानी संघ आणि कर्णधार बाबर आझमचीही शाब्दिक धुलाई केली आहे.


सर्वात वाईट संघ, गोलंदाजी अन् कर्णधार


"यापूर्वी मी बाबर आझमची तुलना स्कॉट एडव्हर्टशी केली होती. त्यावेळी काही पाकिस्तानी चाहत्यांनी माझी खिल्ली उडवली होती. मात्र आज मी पुन्हा उल्लेख करु इच्छितो की पाकिस्तानचे फिरकी गोलंदाज हे सर्वात वाईट फिरकीपटू आहेत. तसेच पाकिस्तानचा कर्णधार हा वर्ल्ड कपमधील सर्वात वाईट नेतृत्व आहे. तसेच पाकिस्तानचा संघ हा सर्वात वाईट क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीही सर्वात घाणेरडी आहे," असं सायमनने कॉमेंट्रीदरम्यान म्हटलं आहे. 


नक्की पाहा >> कॉमेंट्री विसरुन राशीदबरोबर मैदानातच थिरकला 'हा' भारतीय! पाकच्या पराभवानंतरचा Video


तुमचा कर्णधार जर...


तसेच सायमनने पुढे बोलताना कर्णधार बाबर आझमने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेल्या कामगिरीचा संदर्भ देत निशाणा साधला आहे. "तुमचा कर्णधार 92 चेंडूंमध्ये 74 धावा करत असेल आणि 41 ओव्हर खेळल्यानंतर अचानक बाद होत असेल तर तुम्ही सामना जिंकू शकत नाही. यावरुन हे स्पष्टपणे दिसून येतं की तो स्वत:च्या विक्रमांसाठी खेळत असून संघासाठी खेळत नाही," अशी टीका सायमनने केली आहे.



पाकिस्तानच्या या पराभवामुळे त्यांची गुणतालिकेमध्ये मोठा फटका बसला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने तळाच्या स्थानावरुन थेट सहव्या स्थानी झेप घेतली आहे.