World Cup Sanju Samson Joins Team India: आजपासून भारतामध्ये क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी सर्व देशांच्या कर्णधारांचे विशेष फोटोशूट पार पडले. काही दिवसांपूर्वीच वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. त्यावेळी संघात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला आहे. मात्र आता संजू सॅमसन संघाबरोबर जोडला गेला आहे. संजूनेच सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. 


वर्ल्डकपसाठीच्या संघातून वगळल्याने आश्चर्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकपसाठी भारताचा संघ जाहीर करताना कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे तर उपकर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आहे. याशिवाय संघामध्ये के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा या फलंदाजांना संधी देण्यात आली आहे. तर भारतीय गोलंदाजीची धुरा आर. अश्वीन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. या संघामधून युजवेंद्र चहल आणि संजू सॅमसनला वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या दोघांना वगळण्यात आल्याच्या मुद्द्यावर आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया नोंदवत आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र आता वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना संजू सॅमसनचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकपसंदर्भातच हे नाव चर्चेत आलं असून यासाठी कारणीभूत ठरत आहे त्याने केलेली एक पोस्ट.


नक्की वाचा > 'खेळाडूंना बीफ मिळालं नाही तर पाकिस्तान वर्ल्डकपचे सामने जिंकू शकणार नाही, हा भारताचा कट'


संजूने शेअर केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय?


संजू सॅमसन हा वर्ल्डकपचे सामने सुरु होण्याच्या काही दिवसआधीच भारतीय संघाबरोबर जोडला गेला आहे. भारतीय संघाच्या सरावादरम्यान संजू दिसून आला. त्यानेच एक फोटो शेअर करत, "देवांची भूमी अशी ओळख असलेल्या प्रदेशात भारतीय संघाबरोबर..." अशी कॅप्शन दिली आहे. खरं तर तुम्ही विचार करतायं त्याप्रमाणे काही घडलेलं नाही. संजू सॅमसन प्रत्यक्षात मैदानात उतरणार नाही किंवा तो सरावही करत नव्हता. तर भारतीय संघ केरळमध्ये जिथे सराव करत होता त्या ठिकाणी सरावाच्या मैदानाच्या मागील बाजूस संजू सॅमसनचं मोठं चित्र रेखाटण्यात आलं होतं. या चित्रासमोरच सरावचं पीच असल्याने भारतीय खेळाडू एका अर्थाने आपल्या समोर आणि आपल्याबरोबरच सराव करत होते अशा अर्थाने संजूने हा फोटो पोस्ट केला आहे.


नक्की वाचा >> World Cup Schedule: मुंबई, पुण्यातही सामने! कोणत्या तारखेला, कोणत्या मैदानात, कोणाविरुद्ध खेळणार टीम इंडिया



लाखो लाईक्स, हजारो कमेंट्स


संजूने पोस्ट केलेल्या या फोटोला लाखोंच्या संख्येनं लाइक्स मिळाले आहेत. 7 लाखांहून अधिक लाईक्स या फोटोला मिळाले असून साडेसहा हजारांच्या आसपास कमेंट्स या फोटोवर करण्यात आलेल्या आहेत.