World Cup Babar Azam Troll: एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप 5 वेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियान संघाने पाकिस्तानला शुक्रवारी बंगळुरुमध्ये झालेल्या सामन्यात पराभूत केलं आहे. ऑस्ट्रेलियन संघाला स्पर्धेच्या सुरुवातीला पराभवाचे धक्क पचवावे लागले असले तरी ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाने सलग 2 सामने जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप 4 मध्ये झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने आपला चौथा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि 62 धावांनी जिंकला. पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाकडूनही पराभवाचा धक्का बसल्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर टीका होताना दिसत आहे. या सामन्यामध्ये कर्णधार बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. बाबर स्वस्तात तंबूत परल्याने पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी आपल्याच संघातील खेळाडूंची खिल्ली उडवली आहे.


वर्ल्ड कपमध्ये बाबरची सुमार कामगिरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझम वर्ल्ड कप पूर्वीच्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करताना दिसला. मात्र वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमला भारत वगळता कोणत्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात बाबर 18 बॉलमध्ये 5 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या सामन्यात बाबर 15 बॉलमध्ये 10 धावा करुन तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये 18 धावा करुन बाद झाला. भारताविरुद्ध बाबरने अर्धशतक झळकावत 58 बॉलमध्ये 50 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 350 हून अधिक धावांचा पाठलाग करताना 2 विकेट्स गेलेल्या असताना बाबर एक बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला.


बाबरचा किमान शब्दात कमाल अपमान


उसळी न घेतलेल्या एका चेंडूवर हवेत फटका मारण्याच्या नादात बाबर आझम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झाम्पाच्या फिकी गोलंदाजीवर पॅट कमिन्सकरवी झेलबाद झाला. सामन्यानंतर 'स्टार स्पोर्ट्स'वर बाबरसंदर्भात रमीझ राजा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये बाबरचा अपमान केला. "त्याला सिक्स मारण्याची सवय असती तर त्याने हा फटका सहज मारला असता," असं रमीझ राजा म्हणाले. रमीझ राजाने मारलेला हा टोमणा अगदी एखाद्या पुणेकराने मारलेल्या टोमण्याप्रमाणेच आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.


रोहित शर्माचं याच मुद्द्यावरुन केलेलं कौतुक


भारत आणि बांगलादेश सामन्यानंतरच्या आपल्या विश्लेषणामध्ये सिक्स मारण्याच्या मुद्द्यावरुन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव रमीझ राजा यांनी केला होता. "यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये, रोहित शर्माचा पॉवर प्लेमधील स्क्राइक रेट 140 चा आहे. त्याने आतापर्यंत पॉवर प्लेमध्ये 9 सिक्स मारले आहेत. भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज उत्तम आहेत. भारताची फलंदाजी अगदी तळापर्यंत आहे. भारताला पराभूत करणं कठीण आहे," असं रमीझ राजा म्हणाले होते.