ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार हे काय बोलून गेला.. सांगितली स्वत:च्याच टीमची कमजोरी
WorldCup2023: अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
India vs Australia World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपचा अंतिम सामना एका दिवसावर आला आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रविवारी वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळवली जाईल. 5 वेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी भारत भिडणार आहे. टिम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये अद्याप एकही सामना गमावला नाही. सलग 10 सामने जिंकलेल्या टिम इंडियासमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचे आव्हान आहे. अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने ऑस्ट्रेलियाची कमजोरी उघड केली आहे.
भारतीय गोलंदाजांची फिरकी खेळणे कठीण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी कर्णधार टीम पेनने भारतीय फिरकी गोलंदाजांना ऑस्ट्रेलियन संघासाठी धोका असल्याचे म्हटले आहे.यजमान टीम इंडिया या स्पर्धेत अजूनही अजिंक्य असल्याचं माजी कसोटी कर्णधार म्हणाला. त्याच्यामध्ये कोणतीही कमजोरी दिसत नाही. पण ऑस्ट्रेलियन संघाबद्दल असे बोलणे चुकीचे ठरेल. कारण ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांना खेळू शकत नाही, असे त्याने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाहिलेले दृश्य
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत हे पाहायला मिळाले. फिरकी गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगले खेळू शकले नाहीत. मात्र, गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघ चांगला खेळला. डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल चमकदार कामगिरी करत आहेत.
खेळपट्टीचा अहवाल
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी खूप चांगली असल्याचे सिद्ध होते. मैदान मोठे असूनही येथे खूप धावा केल्या जातात. गोलंदाजीसाठी येथील परिस्थिती संमिश्र आहे. अशा स्थितीत अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या होऊ शकते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारली तर ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडू शकते.
कॅच आणि फिल्डिंगमध्ये चूक नको
टिम इंडियामध्ये फिल्डिंगसाठी जडेजासारखा सुपरस्टार खेळाडू आहे. पण असे असतानाही फिल्डिंगमध्ये चुका दिसल्या आहेत. अशीच चूक सेमीफायनलमध्ये 28 व्या ओव्हरला झाली. त्यावेळी मोहम्मद शमीकडून विलियमसनची कॅच सुटली. यानंतर काही वेळातच 33 व्या ओव्हरला शमीने भेदक गोलंदाजी करत विलियमसनला आऊट केले. पण कॅच सुटल्याची चर्चा वारंवार होत राहिली. विलियमसन टिकून राहिला असता तर भारताला मॅच जिंकणे कठीण झाले असते. अशाप्रकारे फिल्डिंगमध्येदेखील चौके वाचवावे लागणार आहेत.
पार्टनरशिप बनू न देणे
सेमीफायनलमध्ये डेरेल मिचेल आणि केन विलियमसन यांच्यात मोठी भागीदारी झाली. ही भागीदारी वाढतच चालली होती. अशी पार्टनरशिप होऊ न देणे हे टीम इंडियासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया संघातदेखील असे अनेक खेळाडू आहेत, जे मोठी खेळी करु शकतात. स्मिथ आणि लाबुशेनवर नजर ठेवायला हवी. त्यांना लवकरात लवकर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवायला हवा.