IND vs NZ : जिंकायचं असेल तर ‘या’ खेळाडूच्या जागी मोहम्मद शमीला घ्या! हरभजनचा टीम इंडियाला सल्ला
Harbhajan Singh On Mohammed Shami : टीम इंडियाचा माजी स्टार फिरकीपटू हरभजन सिंह याने टीम इंडियाला (India vs New Zealand) मोलाचा सल्ला दिलाय. टीम इंडियामध्ये मोहम्मद शमीचा समावेश करावा, असं हरभजन म्हणतो. मात्र, शमीला सामावून घेयचं असेल तर टीम इंडियाचं समीकरण कसं हवं? यावर देखील त्याने जुळवाजुळव केलीये. हरभजन नेमकं काय म्हणतो पाहा...
World Cup 2023 India vs New Zealand : धर्माशालाच्या निसर्गरम्य अशा हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार असलेल्या भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ Clash) यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड कपचा 21 वा सामना खेळवला जाईल. दोन्ही तगडे संघ आमने सामने येणार असल्याने सामन्याची रंगत आणखी वाढणार असल्याचं दिसतंय. अशातच आता सामन्याला काही तास शिल्लक असताना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे. त्यामुळे आता क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या जायबंदी झाल्याने हरभजनने एक अनोखं समीकरण मांडवलं आहे.
काय म्हणाला Harbhajan Singh ?
हार्दिक पांड्या तंदुरुस्त नसल्याने टीम इंडियासाठी मोठी समस्या उभी राहू शकते. जर हार्दिक पांड्या खेळणार नसेल तर टीममध्ये महत्त्वाचे बदल तुम्हाला करावे लागतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन या दोन्ही खेळाडूंच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश करावा, असा सल्ला हरभजन सिंह याने दिलाय.
तुम्ही सूर्यकुमार यादव किंवा इशान किशन यांना फलंदाज म्हणून खेळवू शकता. शार्दुल ठाकूर ऑलराऊंडर असल्याने तुम्ही त्याचा विचार करत असाल. पण तुम्ही मोहम्मद शमीला संघात घेऊन एक 10 ओव्हर पूर्ण करणारा पक्का गोलंदाज खेळवू शकता, असं हरभजन सिंह याने म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळलेला नाही. तर आर आश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे आता टीम इंडियाची निवड कशी असणार? शार्दुल ठाकूरला संधी मिळणार की मोहम्मद शमीला? असा सवाल विचारला जातोय.
हार्दिक पांड्याला विश्रांतीचा सल्ला
पुण्यात झालेल्या बांगलादेश विरुद्ध भारत सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक सतत त्याच्यावर नजर ठेऊन आहे. तो धर्मशालासाठी संघासोबत नसेल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.