ICC ODI World Cup 2023 Theme Song:एशिया कप 2023 स्पर्धेची धूम संपली आहे आणि आकात करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेकडे (ODI World Cup 2023). 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून यात दहा संघ सहभागी होणार आहेत. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेआधी आयसीसीने क्रिकेटचाहत्यांना एक गिफ्ट दिलं आहे. करोडो क्रिकेट चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहात होते, त्या विश्वच चषक स्पर्धेच्या थीम साँगचं (World Cup Theame Song) लाँचिंग करण्यात आलं आहे. 'दिल जश्न बोले' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचं म्यूझिक प्रीतम यांनी दिलं आहे. तर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यांनी आपल्या डान्स या गाण्यात धमाल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंगचा धमाल डान्स
दिल जश्न बोले या गाण्याची सुरुवात रणवीर सिंगपासूनच होते. यात तो एका एका लहान मुलाला खरा क्रिकेट फॅन काय असतो याचं महत्व सांगतो. त्यानंतर ट्रेनमध्ये त्याचा धमाल डान्स सुरु होतो. डोक्यावर हॅट, डोळ्यांवर गॉगल आणि  निळ्या ड्रेसमध्ये रणवीर दिसत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात संगीतकार प्रीतमही दिसत आहेत. ट्रेनच्या छतावर प्रीतम गिटार वाजवताना दिसत आहे. याशिवाय क्रिकेट कॉमेंट्रेटर जतिन सप्रूदेखील या गाण्यात छोट्याश्या भूमिकेत दिसत आहेत. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय पारंपारीक संगीताला डीजेची जोड देण्यात आली आहे. 


भारताचं ;मिशन वर्ल्ड कप'
पाच ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. अहदबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडसंघादरम्यान सलामीच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर भारताच्या मिशन वर्ल्ड कपची सुरुवात 8 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा सलामीचा सामना रंगणार आहे. त्यानंतर क्रिकेट प्रेमीना प्रतीक्षा असलेला भारत-पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ नऊ सामने खेळणार आहे.


भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका
विश्वचषक स्पर्धेआधी भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला सामना 23 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने पंजाबच्या मोहाली स्टेडिअमवर रंगणार आहेत. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कहोली, हार्दिक पांड्या, आणि कुलदीप यादव या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. 



पहिल्या दोन सामन्यात प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत विकेटकिपर-फलंदाज केएल राहुलवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुखापतग्रस्त अक्षर पटेलऐवजी अनुभवी दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली आहे. तब्बल 21 महिन्यांनंतर अश्विन टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. जानेवारी 2022 मध्ये अश्विन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. वर्ल्ड कप आधी अक्षर पटेल दुखापतीतून सावरला नाही तर अश्विनला टीम वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या संघात लॉटरी लागू शकते. 


वर्ल्ड कपसाठी भारताचा 15 खेळाडूंचा संघ (India 15 player squad) 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी यादव. , मोहम्मद सिराज.