Ind vs NZ Mohammed Shami Bowled Video: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सामन्यातील चौथ्याच ओव्हरला मोहम्मद सिराजने भारताला पहिली विकेट मिळवून देत योग्य ठरवला. सामन्यातील 10 ओव्हर पूर्ण होण्याआधीच भारताला 2 विकेट्स मिळाल्या. 10 ओव्हरमध्ये 34 धावांच्या मोदबदल्यात भारताने न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडलं. यापैकी खास बाब म्हणजे भारतीय संघामध्ये वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या मोहम्मद शमीने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. म्हणजेच शमीने वर्ल्ड कपमधील आपल्या पहिल्याचं चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. 


...म्हणून शमीला संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या जायबंदी झाल्याने तो न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. त्यातच भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज ईशान किशनला मधमाश्यांनी चावा घेतल्याने तो सामन्याच्या एक दिवस आधीच संभाव्य प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर पडला. त्यामुळेच भारताने या सामन्यामध्ये स्फोटक फलंदाज आणि मिस्टर 360 डिग्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं आहे. त्याप्रमाणे भारताने शार्दुल ठाकूरऐवजी संघामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. शमीला संधी देण्याची मागणी अगदी भारताच्या पहिल्या सामन्यापासून केली जात होती. शमीबद्दलची ही मागणी योग्य का आहे त्याने पहिल्याच चेंडूत दाखवून दिलं. 


पहिल्याच चेंडूवर काढली विकेट


सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये भारताला पहिली विकेट मिळाली. मोहम्मद सिराजने टाकलेल्या चेंडूवर डेव्हॉन कॉनव्हेने चौकार माराण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रेयस अय्यरने अप्रतिम झेल घेत कॉनव्हेला तंबूत पाठवलं. संघाची धावसंख्या 9 वर असताना 9 चेंडू खेळून भोपळाही न फोडता डेव्हॉन कॉनव्हे बाद झाला. त्यानंतर 5 ओव्हरने म्हणजेच 9 वी ओव्हर शमीला देण्यात आली. वर्ल्ड कपमधील पहिलाचा सामना खेळणाऱ्या शमीने ऑफ स्टम्पवर टाकलेला लेंथ बॉल खेळण्याचा प्रयत्न 26 चेंडूंमध्ये 17 धावांवर असलेला सलामीवर विल याँगने केला. याँगने चेंडू खेळून काढताना बॅट शरीरापासून फारच दूर ठेवली होती. त्यामुळे बॅटची आतील कड घेऊन चेंडू स्टम्प्सवर आदळला आणि बेल्स खाली पडलया. शमीने भारताला दुसरी विकेट मिळवून दिल्यानंतर धरमशालाच्या मैदानात चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शमीने पहिल्याच बॉलवर घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ व्हायरल होतोय.


तुम्हीच पाहा शमीच्या अप्रतिम गोलंदाजीचा व्हिडीओ...


1)



2)



3)



शार्दुल ठरला निष्प्रभ


शार्दुल ठाकुरला पहिल्या 4 सामन्यांमध्ये विशेष प्रभाव पाडता आला नव्हता. त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही तर गोलंदाजीमध्येही त्याने विशेष कामगिरी केली नव्हती. त्यामुळेच पूर्णवेळ गोलंदाज असलेल्या शमीला पाचव्या सामन्यात संधी देण्यात आली आहे.