India vs Pakistan : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या (World Cup 2023) 12व्या सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करून भारताने (Ind vs Pak) सलग तिसरा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचा डाव 42.5 षटकांत 191 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पाकिस्तानी जबरदस्ती करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. भारताने 30.3 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र या सगळ्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरला ( Shoaib Akhtar) दिलेला रिप्लाय फारच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषक 2023 मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभाव केला आहे. या सामन्याच्या एक दिवसाआधीच दोन्ही देशांचे आजी माजी दिग्गज खेळाडू आणि चाहते यांच्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरही सामन्यापूर्वी आपल्या संघासाठी सचिनवर निशाणा साधताना दिसला होता. मात्र आता मास्टर ब्लास्टरने त्याला शातं केले आहे.


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खचाखच भरलेल्या प्रेक्षकांसमोर भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवल्यानंतर सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरची बोलती बंद केली आहे. सामन्याआधी शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. शोएबने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (आधीचे ट्विटर) एक जुना फोटो पोस्ट केली होता, ज्यामध्ये तो सचिन तेंडुलकरची विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत होता. या फोटोसोबत त्याने 'उद्या असं काही करायचं असेल तर थंड राहा' असं लिहिलं होतं. या पोस्टसह, त्याचा संघाबद्दलचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला. मात्र त्याच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी सचिनने सामना संपेपर्यंत वाट पाहिली आणि एक ट्वीट केलं. 


सचिन तेंडुलकरने शोएबला उत्तर देताना म्हटलं की, 'माझ्या मित्रा, तू सांगितले तसे केले आणि सर्वकाही पूर्णपणे थंड ठेवले.' सचिनने यातून थेट पाकिस्तानच्या पराभवरुन टीका आणि शोएबला टोला हाणला आहे. यावर आता शोएबनेही थंड प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या मित्रा, तू आतापर्यंतचा महान खेळाडू आहेस ज्याने या खेळाला शोभा दिली आहे आणि त्याचा सर्वात मोठा राजदूत आहे. आपली मैत्रीपूर्ण चर्चा नक्कीच बदलणार नाही,' असं शोएबने म्हटलं आहे.



दरम्यान, या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला सळो की पळो करुन सोडलं होतं. भारताकडून पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. शार्दुल वगळता सर्व 5 गोलंदाजांनी 2-2 विकेट घेत पाकिस्तानच्या संघाला गारद केलं. त्यानंतर रोहित शर्माने झंझावाती फलंदाजी करत भारतीय संघाला विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला.