India vs New Zealand : श्रीलंकेवर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दणदणीत विजयाची नोंद करून किवींनी पाकिस्तानचा (Pakistan) गाशा गुंडाळला. वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. न्यूझीलंडने बंगळुरूमध्ये लंकादहन करत सेमीफायनलचे (New Zealand in Semis) तिकिट जवळपास निश्चित केलंय. त्यामुळे आता 15 तारखेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळवला जाईल. मात्र, आता या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलयम्सन (Kane Williamson) याला टेन्शन घेतलंय. श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर केनने महत्त्वाचं वक्तव्य केलंय. काय बोलला केन विलयम्सन? पाहुया...


काय म्हणाला Kane Williamson ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या खेळाडूंनी आज खरोखर चांगली कामगिरी केलीये. त्या मधल्या षटकांमध्ये आणि सुरुवातीच्या विकेट घेण्यासाठी आव्हान होतं. फिरकीने कमला केली अन् विकेट्स खोलल्या. नंतर खेळपट्टी खरोखरच मंदावली होती. एकूणच उत्कृष्ट कामगिरीचा पाठलाग करून आम्ही सामना जिंकला. नंतर काही हवामान बदलेल असं आम्हाला वाटलं पण तसं नव्हतं. त्यामुळे अशा गोष्टींची कल्पना आम्हाला येत होती.  परेरासारखे लोक तुमच्यापासून खेळ काढून घेऊ शकतात. आमच्या 5व्या आणि 6व्या फिरकीपटूंना गेममध्ये आणणे नेहमीच छान आहे. एकूणच आमचा प्रयत्न उत्तम होता. आम्हाला काही दिवसांची सुट्टी मिळेल, अशी अपेक्षा आहे. उपांत्य फेरीत सहभागी होणं आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल. मात्र, त्यानंतर आमच्यासमोर आव्हान खडतर आहे. भारताकडून उपांत्य फेरीत खेळणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल, त्यामुळे एक संघ म्हणून आमची परीक्षा होईल, असं केन विलयम्सनने म्हटलं आहे.


ट्रेंड बोल्ट म्हणतो...


उपांत्य फेरीत भारताचा सामना करणे रोमांचक असेल. ते अभूतपूर्व क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे आमची खरी परीक्षा भारताविरुद्ध असेल, असं ट्रेंड बोल्ड म्हणाला आहे.


पाहा सेमीफायनलचं समीकरण


श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर न्यूझीलंडचे 10 अंक झाले आहेत. न्यूझीलंडचा संघ सध्या चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर न्यूझीलंडचा सध्या +0.743 नेट रननेट आहे. त्यामुळे न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करेल, असं निश्चित मानलं जातंय. पाकिस्तानला मोठ्या विजयाची गरज आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या नाड्या इंग्रजांच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.