World Cup 2023 Pakistan Squad : भारतात  5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाची (Pakistan) घोषणा केली आहे. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पंधरा खेळाडूंचा संघ भारतात येणार आहे. पण या संघातून पाकिस्तानचा मॅचविनर खेळाडूला मात्र बाहेर व्हावं लागलं आहे. पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज नसीम शाहला (Naseem Shah) या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्याच्या जागी हसन अलीला (Hasan Ali) संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज फहीम अशरफच्या जागी फिरकी गोलंदाज उस्मा मीरचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशियाकप स्पर्धेत नसीम शाहच्या खांद्याल दुखापत झाली होती. यातून तो अद्याप पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. नसीम शाह तब्बल सहा ते आठ महिन्यांसाठी टीममधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा दुसरा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफही (Haris Rauf) एशिया कप स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, पण तो दुखापतीतून सावरला असून विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. 


भारतातल्या खेळपट्ट्या फिरकीला साथ देतात. हे लक्षात घेऊन पीसीबीचे चीफ सिलेक्टर इंजमाम उल हक यांनी फिरकी गोलंदाज फहीम अशरफला संधी दिली आहे. पण नसीम शाहच्या गैरहजेरीचा संघाला मोठा घक्का बसणार आहे. पण यानंतरही पाकिस्तानची गोलंदाजी चांगलीच मजबूत आहे. शाहीन शाह अफरीदी, हॅरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली सारखे घातक वेगवान गोलंदाज पाकिस्तान संघात आहेत. तर शादाब खानवर फिरकीची मदार असणार आहे. त्याला मोहम्मद नवाज आणि उस्मा मीरची साथ मिळणार आहे. 


फलंदाजीत कमकुवत?
पाकिस्तानची गोलंदाजी भेदक असली तर फलंदाजी काहीशी कमकुवत वाटेतय. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान प्रमुख फलंदाज संघात आहेत. पण जोपर्यंत हे दोघं मैदानात आहेत, तोपर्यंत पाकिस्तानच्या फलंदाजीत दम आहे. पण हे दोघं पॅव्हेलिअनमध्ये परताच पाकिस्तानी फलंदाजी ढेपाळते. फखर जमान, इमाम उल हक, इफ्तिखार अहम, सलमान अली या फलंदाजांना विश्वचषकासाठीच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. पण त्यांच्याकडे विश्वचषक खेळण्याचा अनुभव नाहीए. 


विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ
बाबर आजम (कर्णधार) फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्लाह शफीक, मोहम्मद रिजवान, सउद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, मोहम्मद नवाज, शादाब खान, उसामा मीर, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली


भारत-पाकिस्तान सामना
दरम्यान विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे.