Team India's historical Win : मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 357 धावांचां डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ 55 धावांवर पत्त्यासारखा कोसळला. 302 धावांच्या या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने आता सेमीफायनलचं तिकीट आता पक्कं केलं आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) सर्वाधिक 5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला संघ  (Team India In World Cup 2023 Semi finals) ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे स्टेडियमवर आज मोहम्मद सिराजचं मियाँ मॅजिक पहायला मिळालं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचे फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 358 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. पहिल्या चार ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. पाथुम निसांका आणि दिमुथ करुणारत्ने या दोन्ही सलामीवीरांना खातं देखील खोलता आलं नाही. बुमराहने पहिल्याच बॉलवर विकेट घेत श्रीलंकेवर प्रेशर निर्माण केलं होतं. त्यानंतर सिराजची जादू चालली. सिराजने घातक हल्लाबोल करत तीन विकेट्स उडवल्या. तर दुसऱ्या स्पेलमध्ये शमी गोलंदाजीला आला. शमीने देखील पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट घेत श्रीलंकेला गुघड्यावर टेकवलं. त्यानंतर फास्टर्सने कमाल केली अन् टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स, मोहम्मद सिराजने 3 विकेट्स तर बुमराह आणि जडेजा यांनी 1-1 विकेट घेतलीये. 



प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट आणि गिल यांनी भारताच्या डाव सावरला अन् मजबूत पाया रचला. दोघांनी शतक करता आलं नाही. त्यानंतर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आघात केला. श्रेयस अय्यरने वादळी खेळी केली. मात्र, त्याला देखील शतक साकारता आलं नाही. अखेर जड्डूने तलवार चालवली अन् टीम इंडियाला 350+ चा आकडा पार करून दिला. 


आणखी वाचा - Shubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.


श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.