`जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर मी कपडे काढून बीचवर...`, अभिनेत्रीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल
भारत वर्ल्डकप जिंकणार का याकडे सर्व देशवासियाचं लक्ष लागलं असून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे ही एकच चर्चा आहे. यादरम्यान एका अभिनेत्रीने आपल्या बोल्ड विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेला वर्ल्डकप आता अंतिम टप्प्यात दाखल झाला झाला आहे. रविवारी 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहेत. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी यानिमित्ताने भारताकडे आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकत षटकार लगावण्याची संधी आहे. या वर्ल्डकप फायनलकडे फक्त भारत-ऑस्ट्रेलिया नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे. सोशल मीडियावरही फक्त हीच चर्चा सुरु असून वेगवेगळे दावे केले जात आहेत. यादरम्यान एका अभिनेत्रीने आपल्या बोल्ड विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे.
तेलुगू अभिनेत्री रेखा बोजने आपल्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जर भारतीय संघ वर्ल्डकप जिंकला तर मी विशाखापट्टणम येथील बीडवर न्यूड धावेन अशी घोषणाच तिने केली आहे. रेखा बोजने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत हे सांगितलं आहे. “जर भारताने वर्ल्डकप जिंकला तर मी विजाग बीचवर स्ट्रीकिंग करेन. टीम इंडियाला शुभेच्छा,” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
स्ट्रीकिंग म्हणजे काय?
स्ट्रीकिंग ही खासकरुन एक विदेशी प्रथा आहे. यामध्ये एखाद्या खेळात मोठा विजय मिळवल्यानंतर कपडे काढून धावत आपला आनंद साजरा केला जातो.
दरम्यान ही पोस्ट शेअर केल्यानंतर रेखा बोजवर टीका होत आहे. नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले असून हा फारच घाणेरडा प्रकार असून, अशी घोषणा करण्यामागे नेमका हेतू काय? अशी विचारणा केली आहे. काहींनी तिच्यावर असं खळबळजनक विधान करुन उगाच प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
नेटकऱ्यांकडून टीका होऊ लागल्यानंतर रेखा बोजने स्पष्टीकरण दिलं असून आपण भारतीय संघाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच प्रसिद्धीसाठी करत असल्याचा आरोप फेटाळला आहे.
रेखा बोज ही विशाखापट्टणम येथील कैलासपुरामधील आहे. तिने इंजिनिअरिंग केलं असून शॉर्ट फिल्म केल्यानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने ‘मंगल्यम’, ‘स्वाती चिनुकू संध्या लेलेलो’ आणि ‘कलाय तस्मै नमः’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.