Indian Fans Shaheen Afridi Viral Video: भारत आणि पाकिस्तानचा संघ आज टी-20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये आमने-सामने येणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघातील खेळाडूंबरोबर पाकिस्तानी खेळाडूंच्या कामगिरीवरही भारतीय चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. त्यातही पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर या सामन्याचा बराचसा निकाल अवलंबून असेल असं म्हटलं जात आहे. यामागील कारण म्हणजे न्यूयॉर्कमधील ज्या नासो इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे तेथील खेळपट्टी अगदीच अनपेक्षित असून ती वेगवान गोलंदाजांना फायद्याची ठरेल असं मानलं जात आहे. एकीकडे मैदानावर भारतीय क्रिकेटपटू जोरदार सराव करत असताना दुसरीकडे भारतीय क्रिकेट चाहतेही थेट प्रतिस्पर्धी खेळाडूंबरोबर सेटींग लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव अमेरिकेत शाहीन शाह आफ्रिदीला आला.


भारतीय चाहत्यांनी लावली सेटींग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या सामन्याआधी सरावानंतर फावल्या वेळात न्यूयॉर्कमध्ये भटकंतीसाठी बाहेर पडलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला भारतीय चाहत्यांनी ओळखलं अन् त्याच्याभोवती फोटोसाठी गराडा घातला. शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानी असला तरी त्याच्या गोलंदाजीची शैली आणि वेग कोणत्याही क्रिकेट चाहत्याला भूरळ घालणारा आहे. म्हणूनच भारतीय चाहतेही त्याच्याभोवती जमा झाले. अनेकांनी त्याच्याबरोबर सेल्फीही काढले. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धांमध्ये होऊ घातलेल्या सामन्याच्या पूर्वी झालेल्या या भेटीचा भारतीय चाहत्यांनी सेटिंग लावण्यासाठीही वापर करुन घेतला. 


नक्की वाचा >> India Predicted XI vs Pakistan: इच्छा असूनही पाकिस्तानविरुद्ध 'या' 2 दोघांना मैदानात उतरवता येणार नाही


भारतीय चाहत्यांचं ते वाक्य ऐकून शाहीन शाह आफ्रिदीही हसला


भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना पाहण्यासाठी खास कॅनडामधील व्हँकूव्हर येथून अमेरिकेतील न्यूयॉर्कला आलेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या एका गटाने शाहीन शाह आफ्रिदीला एक मजेदार विनंती केली. ही विनंती ऐकून शाहीन आफ्रिदीलाही हसू अनावर झालं. "केवळ सामना पाहण्यासाठी आम्ही व्हँकूव्हरमधून इथे आलो आहोत. तुला चांगली गोलंदाजी नाही करायचीय हे लक्षात ठेव," असं एका शीख भारतीयाने हसतच शाहीन शाह आफ्रिदीला सांगितलं. ही विनंती ऐकून सर्वचजण हसू लागले. "रोहित आणि विराटला स्वत:चे चांगले मित्र समज," असा सल्ला अन्य एका चाहत्याने दिल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीलाही हसू अनावर झालं. शाहीन शाह आफ्रिदी त्याच्या भावांबरोबर आणि मित्रांबरोबर न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध अशा टाइम्स स्वेअर येथे फिरायला गेलेला असताना हा सारा प्रकार घडला. व्हिडीओमधील भारतीय चाहत्यांच्या मागण्या पाहून आता ही सेटींग लावल्यानंतर भारताचा विजय निश्चित आहे असं म्हटलं आहे.


नक्की वाचा >> T20 World Cup Ind vs Pak: अमेरिकेतला हा सामना भारतात किती वाजता, कुठे LIVE दिसणार?



टी-20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड कसा?


टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या 7 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला केवळ 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करण्यात यश मिळालं होतं. हा सामना दुबईत खेळवण्यात आलेला. हे दोन्ही संघ यापूर्वी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये मेलबर्नच्या मैदानात आमने-सामने आलेले जो सामना भारताने जिंकला होता.