Anushka Sharma Karwa Chauth Virat Kohli: उत्तर भारतीय विवाहित महिलांसाठी सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे करवाचौथचा सण. प्रत्येक विवाहित महिलेसाठी सौभाग्याचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा दिवस कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो. आज उत्तर भारतामध्ये मोठ्या उत्साहामध्ये विवाहित महिला हा सण साजरा करत आहेत. पतीच्या दिर्घायुष्यासाठी महिला करवाचौथचा उपवास ठेवतात. मात्र काही पुरुषही आपल्या पत्नीबरोबर हा पवित्र दिवस उपवास ठेऊन साजरा करतात. विशेष म्हणजे पत्नीसाठी अशापद्धतीने स्वत:ही उपाशी राहणाऱ्यांमध्ये एका खास नावाचा समावेश आहे. हे खास नाव म्हणजे भारतीय संघातील स्फोटक फलंदाज विराट कोहली!


विराटने केलेली पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचं लग्न 2017 साली इटलीमध्ये झालं. दोघांची ओळख एका जाहिरातीच्या शुटींगदरम्यान झाली. शॅम्पूच्या जाहिरातीच्या शुटींगदरम्यान झालेल्या या ओळखीनंतर दोघे डेट करुन प्रेमात पडले आणि विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर 2 वर्षांनी म्हणजे 2019 साली विराटने सोशल मीडियावरुन पत्नी अनुष्का ही आपली फास्टिंग पार्टनर असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच विराट आणि अनुष्का एकत्रच उपवास करतात. विराटने अनुष्काबरोबरचा फोटो शेअर करताना, "जे लोक एकत्र व्रत करतात ते एकत्र हसताना दिसतात... सर्वांना करवाचौथच्या शुभेच्छा" अशी कॅप्शन दिली होती.



अनुष्काने केलेली पोस्ट


अनुष्का शर्मानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनुष्काबरोबरच फोटो शेअर केला होता. अनुष्काने, "माझ्या आयुष्यातील आणि त्यानंतरचाही जोडीदार तसेच आजच्या माझ्या व्रतामधील सोबती," अशी कॅप्शन विराटबरोबरच्या फोटोला दिली होती. या फोटो कॅप्शनवरुन विराटनेही अनुष्काबरोबर करवाचौथचं व्रत आणि उपवास ठेवल्याचं स्पष्ट होत होतं. विराट आणि अनुष्का 11 डिसेंबर 2017 रोजी निकटवर्तीयांच्या उपस्थितीत इटलीमध्ये एका खासगी विवाह सोहळ्यात लग्नबंधनात अडकलेले.



दरवर्षी ठेवतो उपवास


अनुष्का आणि विराटची ही पोस्ट जुनी असली तरी दरवर्षी विराट अनुष्काबरोबर करवाचौथनिमित्त उपवास ठेवतो असं अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. या माध्यमातून विराट सुद्धा अनुष्काच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करुन तिला अनोखी भेट देतो.


वर्ल्ड कपमध्ये विराट तुफान फॉर्ममध्ये


विराट कोहली सध्या वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये व्यस्त आहे. करवाचौथच्या एका दिवसानंतर म्हणजेच उद्या (2 नोव्हेंबर 2023 रोजी) भारतीय संघ श्रीलंकन संघाविरुद्ध मुंबईत सामना खेळणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार असून यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. विराट या वर्ल्ड कपमध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये 6 खेळींमध्ये 354 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील 48 वं शतक पुण्यातील मैदानात झळकावलं. त्यानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 95 धावांची खेळी केली. त्यामुळे विराट आता मुंबईमधील सामन्यात शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय सामन्यांमधील 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करतो का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.