World Cup Video : पाकिस्तानच्या क्रिकेट संघानं नुकतंच यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीनं सुरुवात केली. हैदराबादमध्ये पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा संघ नेदरलँड्सशी भिडला. जिथं संघानं नेदरलँड्सचा पराभव केला. पाकच्या खात्यात आलेल्या या विजयामुळं संघाचं मनोधैर्य तर वाढलंच शिवाय बाबर आझम हा संघाला भारतीय भूमीत विजय मिळवून देणारा पहिला पाकिस्तानी कर्णधार ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rajiv Gandhi International Stadium मध्ये खेळवल्या गेलेल्या या सामन्यामुळं स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाच्या खात्यात गुण गेले आणि भावी काळासाठी प्रतिस्पर्धी संघांना पाकनं नकळत आव्हान दिलं. पाकच्या संघानं 49 षटकांमध्ये सर्वबाद 286 धावा केल्या. ज्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या या संघातून हारिस रौफनं आपल्या गोलंदाजीचा मारा करत नेदरलँड्सला 205 धावांवरच गाशा गुंडाळायला भाग पाडलं. 


पाकिस्तानच्या संघानं नेदरलँड्सवर मात केली खरी. पण, या सामन्यात संघाचा कर्णधार बाबर आझम मात्र प्रभावी कामगिरी करु शकला नाही. अवघ्या 18 धावा करूनच बाबर माघारी गेला. पण, तरीही संघातील खेळाडूंनी मात्र डाव सावरून धरला. याच सामन्यात एक अशी वेळ आली जेव्हा बाबरनं हारिस रौफलच्या कानाखालीच वाजवली. 


आता तुम्ही म्हणाल बाबर बरा आहे ना? तर, आधी एक लक्षात घ्या की बाबरनं हारिसला खरंखुरं मारलं नसून त्यानं थट्टा मस्करीतच त्याच्या गालावर मारलं. हारिस पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयारी करत असतानाच त्याला कर्णधाराकडून ही चापटी मिळाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 



क्रिकेटचे सामने हे दोन संघांमधील स्पर्धा अधोरेखित करत असले तरीही या सामन्यांदरम्यान घडणाऱ्या अनेक गोष्टीच खऱ्या अर्थानं रंगत वाढवतात आणि त्यांचीच जास्त चर्चाही होते. बाबर आणि हारिसमधील हा मजेशीर क्षणही त्यातलाच एक. 


नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानधून कोणत्या खेळाडूंचा समावेश होता? 


बाबर आझम (कर्णधार), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.