World Cup : भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरुवात करत क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. आतापर्यंतच्या ODI World Cup च्या इतिहासात टीम इंडियानं पाकिस्तानचा आठव्यांदा पराभव केला. हा विजय मोठ्या स्तरावर क्रिकेटप्रेमी आणि संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवून गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या भारतीय संघानं अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दाखवलेला खेळ पाकिस्तानच्या संघाला पायाच हादरवून गेला आणि पाहता पाहता संघ पराभवाच्या नजीक पोहोचत गेला. तिथं मैदानात team India नं सामना जिंकला आणि इथं सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पक मीम्सचा पाऊस सुरु झाला. 


पाकच्या संघाला भारतीय क्रिकेटप्रेमींनी नकळत डिवचलं... 


भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) अशा दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये मैदानात काही असे प्रसंग पाहायला मिळाले ज्याची बरीच चर्चा झाली. अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी पाकच्या कर्णधार बाबर आझमला विविध घोषणा देत डिवचलं, तर मोहम्मद रिझवानचीहीझिल्ली उडवली. पण, काही गोष्टी मात्र इतक्या टोकाच्या होत्या की क्रिकेटप्रेमींमध्येही दोन गट तयार झाले. या साऱ्या चर्चांमध्येच पाकिस्तानच्या क्रिकेट संघातील माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ समोर आला जिथं तो असं काही बोलून गेला की त्याचा हा व्हिडीओ वारंवार पाहिला गेला. 


जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल... 


सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ Legends League Masters दरम्यानचा आहे. ज्यावेळी त्याला बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील संघाच्या विश्वचषकातील भारत दौऱ्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. 


बीसीसीआयनं आशिया चषकासाठी भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्यानंतर पकिस्ताननंही आयसीसी वर्ल्डकपसाठी पाकच्या खेळाडूंना भारतात न पाठवण्याची अट ठेवली. ज्यानंतर या प्रश्नावर एक सुवर्णमध्य साधला गेला. 


हेसुद्धा वाचा : World Cup 2023: नेदरलँड्सच्या एका चिठ्ठीने केला गेम, नेमकं 'त्या' कागदात होतं काय? अखेर खुलासा झालाच!


 


संघांमधील असणाऱ्या याच परिस्थितीवर आफ्रिदीनं वक्तव्य केलं होतं. 'कोण नकार देतंय? भारतच... पाकिस्तान नव्हे. तुम्ही भारतीय संघाला इथं पाठवा तर खरं, आम्ही त्यांना खूप चांगली वाणूक देऊ, त्यांचा पाहुणचार करू', असं तो म्हणाला होता. जिथं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमधील सामन्याचा उल्लेख होतो तिथंतिथं वारंवार शत्रुत्वाचीच चर्चा होते. पण, काही नेटकऱ्यांनी शाहिद आफ्रिदीच्या या मित्रत्वाच्या वत्तव्यावर लक्ष वेधत त्याच्या पाठिवर कौतुकाची थापही मारली आहे. 



फक्त आफ्रिदीच नव्हे, तर दोन्ही संघातील खेळाडूसुद्धा त्यांच्या परिनं मैदानात आणि मैदानाबाहेरही सध्या एकमेकांसोबत मैत्रीचं नातं जपताना दिसतात. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं होतं.