World Cup Dirty Seats In Indian Stadium: आयसीसीच्या 2023 च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. दर 4 वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये यंदाच्या पर्वात 10 संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात आमने-सामने येणार आहेत. हे सामने भारतामधील 10 वेगवेगळ्या मैदानावर खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी मागील अनेक महिन्यांपासून तयारी सुरु आहे. अनेक मैदानांच्या नुतणीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र सराव सामन्यांमध्येच नियोजनातील ढिसाळपणा समोर आला असून या संदर्भातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


नेमकं घडलं काय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने अहमदाबाद, दिल्ली. धर्मशाला, लखनऊ, कोलकाता, मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबादच्या मैदानावर खेळवले जाणार आहे. यापैकीच हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सराव सामने खेळवले जात आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवारी (3 ऑक्टोबर रोजी) झालेल्या सामन्यादरम्यानचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. या मैदानामधील आसन व्यवस्थेसंदर्भातील अनावस्था या व्हिडीओत दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आणि फोटोंमध्ये मैदानातील आसनांवर पक्ष्यांनी केलेली घाण दिसत आहे. हातात वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीट आणि बॅकग्राऊण्डला या घाणेरड्या आसनांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे.


1)



2)



3)



अनेकांनी केली टिका


हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर निशाणा साधला आहे. 'ही अशी आहे का तुमची वर्ल्डकपची तयारी?' असा प्रश्न काहींनी विचारला आहे. अनेकांनी ही 'फारच लज्जास्पद बाब' असल्याचं म्हणत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडून असं अपेक्षित नसल्याचं म्हटलं आहे. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात..


1)



2)



3)



4)



5)



6)



यासंदर्भात अद्याप बीसीसीआय किंवा हैदराबाद क्रिकेट बोर्डाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.