World Cup Final India vs Australia Gilchris Tips: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. हा सामना एक लाखांहून अधिक प्रेक्षकांसमोर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर दावा सांगत आहेत. भारतीय संघ या स्पर्धेमध्ये एकही सामना पराभूत झालेला नाही. साखळी फेरीतील आपले सर्वच्या सर्व म्हणजेच 9 सामने जिंकून भारताने पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं. त्यानंतर सेमी-फायलनमध्ये न्यूझीलंडच्या संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 70 धावांनी धूळ चारत चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला. अपराजित भारतीय संघ 11 वा विजयासहीत वर्ल्ड कप 2023 वर नाव कोरणार की ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकणार याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे. मात्र अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंकडून भारतीय संघाला पराभूत करणं शक्य नाही असं म्हटलं जात असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर अ‍ॅडम गिलक्रिस्टने भारताचा पराभूत करण्याचा मंत्र पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला सांगितला आहे.


भारताला पराभूत करणं कठीण पण शक्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी म्हणजेच साखळी फेरी संपल्यानंतर सेमीफायलनआधी अ‍ॅडम गिलक्रिस्टने भारताला पराभूत करणं कठीण असलं तरी अशक्य नाही असं म्हटलं होतं. तसेच भारताला कसं हरवता येईल याबद्दलही अ‍ॅडम गिलक्रिस्टने आपलं मत व्यक्त केलं होतं. भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला पराभूत करणं कोणत्याही संघाला फार आव्हानात्मक असणार आहे, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. मात्र भारताला पराभूत करणं अशक्य नाही असंही गिलक्रिस्टने नमूद केलं आहे. भारताला पराभूत करण्यासाठी काय करावं हे सुद्धा गिलक्रिस्टने सांगितलं आहे. गिलक्रिस्टने भारताला पराभूत करण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीच्या दृष्टीकोनातून काही सल्ले दिलेत.


आधीच भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची शक्यता केलेली व्यक्त


दिव्यांच्या प्रकाशात खेळताना मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे फारच धोकादायक ठरतात. त्यामुळेच भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर भारताला प्रथम गोलंदाजी करु द्यावी, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. याचसंदर्भातून गिलक्रिस्टने भारत आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झालातच तर ऑस्ट्रेलियाने काय करावं याबद्दल भाष्य केलं होतं. "भारताविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजी केली पाहिजे," असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे. 


नक्की वाचा >> World Cup Final आधी समोर आली रोहितबरोबरच सर्व भारतीयांचं टेन्शन वाढवणारी आकडेवारी


गिलक्रिस्टने नेमका काय मंत्र दिला?


"माझ्या मते टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी केली पाहिजे. भारत आतापर्यंत ज्या पद्धतीने खेळला आहे ते पाहता हेच उत्तम आहे. धावांचा पाठलाग करताना भारत कमकुवत आहे असं माझं म्हणणं नाही. विराट कोहली संघात असल्याने भारताने आतापर्यंत सर्व संघांनी दिलेल्या लक्ष्याचं यशस्वीपणे पाठलाग केला आहे. मात्र दिव्यांच्या उजेडाखाली भारतीय गोलंदाज इतर संघांसाठी अधिक घातक ठरतात. सिराज शमी आणि बुमराह फार उत्तम कामगिरी करत आहेत. उजेडामध्ये त्यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं तुलनेनं अधिक सोपं असेल," असं गिलक्रिस्ट म्हणाला.


नक्की वाचा >> World Cup Final: टॉस जिंकल्यावर बॅटिंग करणार की बॉलिंग? रोहित स्पष्टच म्हणाला, 'मला वाटतं की टॉस..'


ऑस्ट्रेलियन कर्णधाराचंही हेच मत


ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने टॉसबद्दल बोलताना गिलक्रिस्टच्या मताशी साधर्म्य साधणारं मत व्यक्त केलं आहे. "मला वाटतं की उजेडामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करुन घ्यावी कारण नंतर लाईटच्या प्रकाशात फलंदाजी कठीण जाते. मात्र दुसऱ्या इनगिंगमध्ये नंतर दवामुळे चेंडू निसटेल अशीची भिती आहे," असं कमिन्स म्हणाला. टॉसबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार संभ्रमात असल्याचं यावरुन स्पष्ट होतंय.


भारताच्या यशाचं गुपित


भारताच्या यशाचं गुपित उलगडून सांगताना गिलक्रिस्टने भारताने योग्यवेळी त्यांचे फिरकी गोलंदाज हे भारतीय परिस्थितीमध्ये अधिक प्रभावी ठरतील हे हेरलं, असं म्हटलं आहे. मात्र परदेशामध्ये भारताला चांगली कामगिरी करायची असेल तर वेगवान गोलंदाजीवर अधिक भर देऊन ती उत्तम करावी लागेल, असं गिलक्रिस्टने म्हटलं आहे.