Legend Statement on World Cup Trophy : टीम इंडियाने आतापर्यंत 2 वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. यावेळी 1983 चा वर्ल्डकप ( World Cup 1983 ) चाहत्यांच्या लक्षात असतो. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 मध्ये वर्ल्ड कप ( World Cup 1983 ) जिंकला होता. वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. अजूनपर्यंत या विजयी क्षणाची आठवण काढत चाहते आनंदी होतात. मात्र अशातच आता एका दिग्गजाने खळबळजनक वक्तव्य केलंय, जे भारतीय चाहत्यांना अजिबात रूचणार नाही. 


वर्ल्ड कप जिंकण्याची दावेदार मानली जात नव्हती टीम इंडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1983 सालच्या वर्ल्डकपमध्ये ( World Cup 1983 ) भारत बलाढ्या टीम म्हणून मानली जात नव्हती. या स्पर्धेत त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि त्यानंतर दोन वेळा चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजसारख्या टीम्सना पराभूत केल आणि संपूर्ण जगाला आश्चर्ययाचा धक्का दिला. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीमने वेस्ट इंडिजचा ( West Indies ) सामना केला. 


फायनलमध्ये वेस्ट इंडिज टीमचा ( West Indies ) भाग असलेले अनुभवी अँडी रॉबर्ट्सने ( Andy Roberts ) यांनी त्यांच्या एका एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, भारत लक बाय चान्स म्हणजे नशिबाच्या जोरावर फायनल जिंकला. रॉबर्ट्स यांच्या मते, वेस्ट इंडिज ( West Indies ) ही एक उत्तम टीम होतं. मात्र त्यावेळी भारताचे स्टार्स त्यांच्या बाजूने होते. 


स्पोर्टस्टारने नुकतंच या अँडी रॉबर्ट्स ( Andy Roberts ) यांचा इंटरव्ह्यू घेतला. अँडी रॉबर्ट्स हे वेस्ट इंडिजचे दिग्गज पेसर होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, होय आम्ही भारताकडून हरलो खरे...मात्र खरं सांगायचं तर आम्हाला एका चांगल्या टीमने हरवलं नाही. क्रिकेटकडे लोक नशिबाचा आणि संधीचा खेळ म्हणून पाहत नाहीत. 1983 पर्यंत आम्ही वर्ल्डकपमध्ये एकही सामना गमावला नव्हता. मात्र 1983 मध्ये आम्ही भारताकडून दोनदा हरलो. मुळात आम्ही फॉर्ममध्ये होतो, मात्र खराब खेळामुळे आम्हाला पराभव स्विकारावा लागला. 


1983 मध्ये जिंकणं हे भारताचं नशीब होतं. आमची इतकी मोठी टीम असूनही आम्ही 1983 मध्ये दोन सामने हरलो आणि दोन्ही तेही भारताविरुद्ध. तो फक्त खेळ होता. 180 च्या जवळ आऊट झाल्यानंतर नशिबाने भारताला साथ दिली, असं अँडी रॉबर्ट्स ( Andy Roberts ) यांनी सांगितलं.