Video : ग्राऊंड स्टाफशी बाबर आझम असा वागला की...; सामना राहिला बाजूला, इथं भलतीच चर्चा रंगली
World Cup : क्रिकेटच्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या सामन्यापेक्षाही जास्त चर्चा अनेकदा सामन्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांबाबत होते. असाच एक प्रसंग नुकताच अनेकांनी पाहिला.
World Cup : क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर अनेकदा काही अशा घटना घडतात की, खऱ्या अर्थानं या खेळाची एक सुरेख बाजू आपल्या सर्वांच्याच समोर येते. असाच एक प्रसंग नुकताच घडला आणि क्रिकेटच्याही पलीकडे असणारी मनानं जोडलेली नाती सर्वांसमोर आली. निमित्त ठरलं ती म्हणजे पाकिस्तानचा कर्णधार (babar azam) बाबर आझमची एक कृती.
हैदराबादमध्ये क्रिकेटप्रेमींनी पाहिला एक सुरेख क्षण...
पाकिस्तानचा संघ गेल्या बऱ्याच दिवसांपासून हैदराबादमध्ये होता. आयसीसी वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची आखणीच अशी होती की त्यांचा इथं असणारा मुक्काम तुलनेनं जास्त होता. आतापर्यंत पाकिस्तानच्या संघानं World Cup मध्ये दोन सराव सामने खेळले. तर, संघाचे स्पर्धेतील मुख्य सामनेही हैदराबादमध्येच खेळवले गेले. दरम्यानच्या काळात हैदराबादच्या स्टेडियमध्ये असणाऱ्या ग्राऊंड स्टाफशी पाकच्या संघाचं एक सुरेख आणि मैत्रीपूर्ण नातं आकारास आल्याचं पाहायला मिळालं.
हेसुद्धा वाचा : Ind vs Afg: विराट कट्टर वैऱ्याविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरणार; अफगाणी कॅप्टन म्हणतो, 'असा आक्रमकपणा...'
आता जेव्हा या संघ इथं मोसमातील शेवटचा सामना खेळला तेव्हा सर्व खेळाडू आणि संघाच्या वतीनं कर्णधार बाबर आझम यानं ग्राऊंड स्टाफ अर्थात मैदानासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यानं या मंडळींना जर्सीसुद्धा भेट दिल्याचं पाहायला मिळालं.
काही खास क्षण थेट क्रिकेटच्या मैदानातून...
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या (Pak Vs SL) सामन्यादरम्यान पाकच्या संघातील बऱ्याच खेळाडूंनी हैदराबादमधील (Hyderabad) ग्राऊंड स्टाफसोबत फोटो काढले. ज्यानंतर बाबर आझमच्या कृतीनं सर्वांच्या नजरा वळवल्या. कारण, त्यानं आपली जर्सी या कर्मचाऱ्यांना भेट दिली.
हैदराबादमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील तीन सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यापैकी पाकनं आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला. हैदराबादच्याच मैदानात पाकच्या संघानं आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही गाठला होता. थोडक्यात हे मैदान पाकच्या संघासाठी फार खास ठरलं. या मैदानात संघानं अनेक खास क्षणही अनुभवले. ज्यामुळं आता संघातील खेळाडूंनी तिथं काम करणाऱ्या ग्राऊंड स्टाफचे आभार मानले आणि Cricket is a game of hearts and emotions या ओळीवर पुन्हा एकदा अनेकांचाच विश्वास बसला.