नवी दिल्ली : भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आमने-सामने आले होते. आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कपचं शेड्युल जारी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 मार्च 2022 पासून न्यूझीलंडमध्ये वन डे वर्ल्ड कप सुरू होत आहे. पहिला सामना भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. महिला वन डे वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्ये पुढच्या वर्षी सुरू होत आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज ही घोषणा केली.


महिला टीम इंडियाचा सामना 6 मार्च रोजी तोरंगा इथे पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. 4 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी 5 मार्चला हॅमिल्टनमध्ये होईल.


वन डे वर्ल्ड कपसाठी 31 दिवस सामने चालणार आहेत. यामध्ये 31 सामने खेळवले जातील. वन डे वर्ल्ड कपसाठी 8 संघ आमनेसामने येणार आहेत. ऑकलंड, क्राइस्टचर्च, ड्युनेडिन, हॅमिल्टन, टॉरंगा आणि वेलिंग्टन या 6 शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.