मुंबई: IPL 2021 कोरोनामुळे स्थगित झालं आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष्य न्यूझीलंड विरुद्ध भारत होणाऱ्या सामन्यावर आहे. या सामन्यासाठी नुकतंच टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांसाठी संघात यावेळी काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला सुट्टी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टॅन्डबाय खेळाडू म्हणून गुजरातमधील 23 वर्षांच्या अर्जन नागवासवाला या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आणि इंग्लंड विरुद्ध सामन्यांसाठी अर्जन संघात असणार आहे. अर्झान नागवासवाला वेगवान गोलंदाज आहे. अर्जन गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील नारगोल गावचा रहिवासी आहे. 



अर्झान नागवासवालाने आतापर्यंत 16 फर्स्ट क्लास सामने 20 ए क्लास सामने आणि 15 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 16 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 62, 20 ए क्लासमध्ये 39 आणि टी 20 मध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत.


अर्झान नागवासवाला 23 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयातच त्याने इतिहास घडविला आहे. 46 वर्षानंतर तो भारतीय पुरुष संघात निवडला जाणारा पहिला पारशी क्रिकेटपटू ठरला आहे. या पूर्वी फारुख इंजीनियरचा टीम इंडियाचा भाग होता. 


भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाबद्दल बोलताना डायना एडुल्जी ही शेवटची पारशी महिला क्रिकेटपटू होती जिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. 1993 मध्ये तिने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.