ICC World Test Championship : नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ( AUS vs IND ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (  ICC World Test Championship ) फायनल सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा पराभव केला. दरम्यान WTC Final च्या फायनल सामन्यात टीम इंडियाचा हा दुसरा पराभव होता. दरम्यान या सामन्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने 2023 ते 2025 पर्यंतच्या कार्यक्रमाची घोषणा केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) पहिला सामना इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान यामध्ये ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने विजय मिळवलाय. दरम्यान या विजयामुळे पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवर ( ICC World Test Championship Points table ) परिणाम झालेला दिसून आलाय. 


ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी 


ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) सध्याचा चॅम्पियन संघ आहे. 2023-25  पॉईंट्स टेबलवर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. अंतिम सामन्यानंतर 2023-25 ​​चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. हा सामना जिंकल्याने ऑस्ट्रेलियाची टीम पॉइंट टेबलवर अजूनही पहिल्या स्थानावर आहे. 


यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान इंग्लंडच्या टीमचं आहे. मुख्य म्हणजे हा सामना फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला गेलाय. त्यामुळे या दोन्ही टीम पॉईंट्स टेबलवर कब्जा करून आहेत.


टीम इंडिया या स्पर्धेत किती सामने खेळणार?


नुकतंच या सामन्याची फायनल रंगली असून त्यामध्ये 209 रन्सने भारताला पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवानंतर टीम इंडियाने आता 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी सुरू केलीये. अशातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला एकूण 19 सामने खेळायचे आहेत. यामध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी दाखवल्यास टीम इंडियाला फायनल गाठणं शक्य होणार आहे.


फायनल सामन्यापूर्वी खेळण्यापूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 टेस्ट, इंग्लंडसोबत 5 टेस्ट, बांगलादेशसोबत 2 टेस्ट, न्यूझीलंडसोबत 3 टेस्ट आणि ऑस्ट्रेलियासोबत 5 टेस्ट सामने खेळायचे आहेत.