मुंबई: टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ निश्चित करण्यात आला आहे. यावेळी काही खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यासोबतच आणखी एक बॉलर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बॉलरवर सध्या कठीण परिस्थिती ओढवली आहे. इंग्लंड विरुद्ध भारतात झालेल्या सामन्यांमध्ये त्याला केवळ एक विकेट घेण्यात यश मिळालं होतं. त्याची कामगिरी चांगली न राहिल्यामुळे त्याला यावेळी संधी दिली नसल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीमध्ये या बॉलर महेंद्रसिंह धोनीला खूप मिस करत आहे. 


महेंद्रसिंह धोनीला का करतोय मिस?


कुलदीप यादवला यावेळी टीम इंडियामध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नाही. IPLमध्ये कोलकाता संघाकडून त्याने सामने खेळले. त्यानंतर कोरोनामुळे IPL 2021चे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुलदीपने आपलं मन मोकळं केलं. 


मैदान असो किंवा मैदाना बाहेर महेंद्रसिंह धोनीची खूप आठवण येते असं कुलदीपने सांगितलं. महेंद्रसिंह धोनीने दिलेला प्रत्येक सल्ला त्याला उपयोगी पडत होता. त्याच्यातील कमतरता भरून काढण्यासाठी कुलदीपला मदत होती. 


मला असं वाटतं की प्रत्येक गोलंदाजाला एका चांगल्या साथीदाराची गरज असते. महेंद्रसिंह धोनी यांचा सल्ला माझ्यासाठी मोलाचा असायचा. माहीभाईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर मी आणि चहल एकत्र खेळलो नाही.