Shah Rukh Khan talking about Rishabh Pant's accident : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करतोय. आपल्या फलंदाजीतून उत्तम शॉट पाहण्याची संधी ऋषभ प्रेक्षकांना देतोय. अपघातातून वाचल्यानंतर ऋषभने ज्याप्रकारे कमबॅक केलं ते पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटतंय. अनेकांनी ऋषभला भक्कम साथ दिली अन् विश्वास दाखवला. अशातच आता कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने ऋषभच्या अपघातावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. स्टार स्पोर्टशी बोलताना किंग खानने भावना व्यक्त केल्या.      


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला शाहरुख खान?


ऋषभचा अपघात भयानक होता. मी त्याच्या कारचा व्हिडिओ पाहिला. तो अपघात खरोखर भयानक होता. कारण त्या अपघाताचा परिणाम काय झाला हे आम्हाला तेव्हा माहीत नव्हतं. त्यामुळे तुम्हाला सर्वात वाईट भावना मनात येतात. माझ्यासाठी ही सर्व मुलं अशीच आहेत. एखादा खेळाडू जखमी झाला तर ते भयानक असतं. त्यांचा अपघात मनाला चटका देणारं होतं, असं शाहरुख खान म्हणतो.


खेळाडूचा असा अपघात झाला तर तो लवकर बरा होवो, अशी प्रार्थना करावी. जेव्हा मी ऋषभला भेटलो तेव्हा मी त्याला म्हणालो की, तू उठू नकोस, मी त्याला मिठी मारली आणि विचारलं की तू बरा आहेस का? अपघातानंतर मला खरोखर आनंद झाला आहे की तो चांगला खेळत आहे आणि मला आशा आहे की तो चांगला खेळत राहील, असं शाहरुख खानने म्हटलं आहे.


पाहा Video



दरम्यान, 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून डेहराडूनला जात असताना ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला होता. त्यावर आयपीएलपूर्वी बोलताना ऋषभने भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटलं की माझा वेळ संपलीये. अपघाताच्या वेळी मला कुठं दुखापत झाली होती ते माहीत होतं. रजत आणि निशू कुमार यांच्यामुळे मी जिवंत आहे. मी आयुष्यभर या दोन मुलांचा ऋणी राहीन. स्वत:ला भाग्यवान समजतो की अपघातात पाय गमावला नाही. हाडाशिवाय इतर कोणत्याही मज्जातंतूला इजा झाली असती, असं ऋषभने म्हटलं होतं.