WPL 2023 Schedules: महिला IPL चं वेळापत्रक जाहीर, `या` तारखेपासून रंगणार थरार!
WPL Cricket 2023 Schedule: हंगामातील पहिली (WPL 2023 1st Match) लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Gujarat Giants vs Mumbai Indians) होणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
WPL 2023 : महिला प्रीमियर लीग 2023च्या लिलावात (WPL Auction 2023) फ्रँचायझींनी अनेक मोठ्या महिला क्रिकेटपटूंवर जोरदार बोली लावली गेली. महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव सोमवारी संपन्न झाला. या लिलावात एकूण पाच संघांनी 60 कोटी रुपये खर्च करून 76 खेळाडूंना खरेदी केलंय. त्यामुळे आता पुरुषांच्या तोडीस तोड महिला आयपीएलचे (IPL 2023) सामने पहायला मिळतील, असं पहायला मिळतंय. अशातच आता बीसीसीआयने (BCCI) महिला प्रीमिअर लीगसाठीचे वेळापत्रक जाहीर केलंय. (WPL 2023 BCCI announces schedule for inaugural edition Mumbai Indians to face Gujarat Giants in opener)
WPL 2023 चं वेळापत्रक जाहीर (WPL 2023 Schedules)
यंदाच्या वर्षी महिला आयपीएल म्हणजेच WPL 2023 ला येत्या 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिली (WPL 2023 1st Match) लढत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात (Gujarat Giants vs Mumbai Indians) होणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चार मार्चपासून सुरू झालेली ही स्पर्धा 26 मार्चपर्यंत खेळवली जाईल. स्पर्धेची फायनल ब्रेबॉर्न स्टेडियमवर 26 मार्च रोजी खेळवली जाणार आहे.
पाहा ट्विट -
महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (DC), गुजरात जायंट्स (GT), मुंबई इंडियन्स (MI), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि यूपी वॉरियर्स (UW) हे संघ एकमेकांना भिडणार आहेत. महिला प्रीमियर लीगचे सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियमवर खेळवले जातील, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
आयपीएलप्रमाणेच साखळी फेरीदरम्यान चार डबल हेडर सामने खेळवले जातील. पहिला सामना दुपारी साडेतीनला तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसातला खेळवला जाईल. पहिला सामन्यात गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स एकमेकांसमोर असतील.
पाहा मुंबईचा संघ (Mumbai Indians)
हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.
पाहा गुजरातचा संघ (Gujarat Giants)
ॲश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, ॲनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.