WPL 2023 : महिला प्रिमीयर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात (WPL 2023 Eliminator Match) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने युपीवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने महिला प्रिमीयर लीगच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने तब्बल 72 रन्सने युपीच्या महिलांचा पराभव केला आहे. अवघ्या 110 रन्समध्ये युपीची टीम ऑल आऊट झाली.


मुंबईचं युपीला 183 रन्सचं आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात तुफान फलंदाजी केली. 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून मुंबईने 182 रन्स केले. यामध्ये नॅट सीवर-ब्रंटने 38 बॉल्समध्ये 72 रन्सची खेळी केली. तर अमेलिया केरने 19 बॉल्समध्ये 29 रन्स केले. याशिवाय हीली 26, यास्तिका 21 आणि कर्णधार हरमनप्रित कौरने 14 रन्सची खेळी केली.


इस्सी वोंगच्या गोलंदाजीसमोर युपीच्या फलंदाज ढेर


मुंबईची गोलंदाज इस्सी वोंगने महिला प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचलाय. युपी वॉरियर्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात तिने हॅटट्रिक घेतली. ही कामगिरी करणारी ती या स्पर्धेतील पहिली गोलंदाज ठरलीये. इस्सीने 13व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरवर किरण नवगिरेला बाद केलं.


यानंतर इस्सीने तिसर्‍या बॉलवर इस्सी वँगने सिमरन शेखला क्लीन बोल्ड आऊट केलं. तर चौथ्या बॉलवर सोफी एक्लेस्टोनला देखील क्लीन बॉलिंग करून हॅट्रिक पूर्ण केली.


मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11


हीली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सीवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग, अमनजोत कौर, हुमॅरा काजी, जिंतिमनी कलिता, सायका इशाक


यूपी वॉरियर्स प्लेईंग 11


एलिसा हीली (कर्णधार/विकेटकीपर), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅक्ग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ति शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजलि सरवानी, पार्श्वी चोपड़ा, एस यशश्री