Womens Premier League 2023 : महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या मोसमात आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र दुसरीकडे महत्त्वाच्या खेळाडूंना फारसी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होताना दिसतोय. यामध्ये डब्ल्यूपीएल लिलावात सर्वात महागडी खेळाडू म्हणून निवड झालेल्या स्मृती मानधनाचाही (Captain Smriti Mandhana) समावेश आहे. आतापर्यंतच्या झालेल्या सर्वच सामन्यात फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्हीमध्ये स्मृती पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच मोसमात मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (RCB) अवस्था अत्यंत वाईट आहे. बंगळुरुच्या संघाने सलग 4 सामने गमावले आहेत. गुणतालिकेतही स्मृतीचा संघ तळाशी आहे. दुसरीकडे आता संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. भारताची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाला  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने 3.40 कोटी रुपयांच्या बोलीसह संघात समाविष्ट करून घेतले होते. यावरुनच आता स्मृतीला लक्ष्य करण्यात आल्याने तिने पराभवाबाबत भाष्य केले आहे.


काय म्हणाली स्मृती मानधना?


"मला वाटतं गेल्या चार सामन्यांमध्ये असे घडत आहे. आम्ही चांगली सुरुवात करतो आणि नंतर विकेट गमावतो. मी जबाबदारी घेईन. वरच्या फळीतील फलंदाजांच्या रूपात आम्हाला गोलंदाजांच्या बचावासाठी धावा करण्याची गरज आहे. 7-15 षटकादरम्यान आम्ही प्रत्येक षटकात 7-8 धावा करण्याबाबत बोललो होतो. पण ते उपयोगी ठरले नाही. आम्ही एक संतुलित संघ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सर्व खेळाडूंशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला आहे. मागील आठवडा आमच्या संघासाठी खूपच कठीण गेला आहे. खूप काम करायण्याची गरज आहे," असे स्मृतीने म्हटलं आहे.



दुसरीकडे, महिला प्रिमियर लीगमध्ये आरसीबीच्या संघाला आतापर्यंतच्या सगळ्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. स्मृती मंनधनाला या सामन्यांमध्ये काही खास कामगिरी करता आलेली नाही. स्मृतीने चार सामन्यांमध्ये केवळ 80 धावा केल्या आहेत.


दरम्यान, शुक्रवारी यूपी वॉरियर्सने आरसीबीचा 10 गडी राखून पराभव केला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकात 138 धावा केल्या होत्या. यानंतर यूपी वॉरियर्सने हे लक्ष्य 13 षटकात विकेट न गमावता पूर्ण केले. बंगळुरूकडून सोफी डिव्हाईन 36 आणि अॅलिस पेरीने 52 धावा केल्या. याशिवाय श्रींका पाटीलने 15 आणि एरिन बर्न्सने 12 धावा केल्या. यूपी वॉरियर्सकडून देविका वैद्यने नाबाद 36 आणि अॅलिसा हिलीने नाबाद 96 धावा केल्या.