WPL 2023 GGW vs DCW : महिला प्रीमियर लीग (WPL 2023) मध्ये आज गुजरात जायंट्स (Gujarat Giants) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी विजय झाला आहे. दिल्लीने गुजरातवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियाची ओपनर आणि दिल्लीची फलंदाज शेफाली वर्माने उत्तम फोर मारत दिल्लीला विजय मिळवून दिला आहे. अवघ्या 7.1 ओव्हरमध्ये दिल्लीने हे गुजरातने दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं आहे. 


शेफाली वर्माची शानदार खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातविरूद्धच्या सामन्यात शेफाली वर्माने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. तिने अवघ्या 28 बॉल्समध्ये 76 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. शेफालीच्या तुफान फटकेबाजीसमोर गुजरातच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. अखेर 7 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर फोर लगावत तिने दिल्लीला विजय मिळवून दिला.


गुजरात जाएंट्सचा खराब खेळ


गुजरातच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला नाही. गुजरातकडून किम गार्थने सर्वाधिक म्हणजेच 32 रन्सची खेळी केली. तर Georgia Wareham ने 22 रन्सचं योगदान दिलं. हरलीन देओल 20 तर तनुजा कंवरने 13 रन्स केले. याशिवाय कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. 


गुजरात जाएंट्सला 106 रन्सचं आव्हान


गुजरातच्या टीमने कसाबसा स्कोर 100 रन्सच्या पार नेला. दिल्लीच्या गोलंदाजी तोफ्यासमोर गुजरातची टीम अवघी 105 रन्स करू शकली. 106 रन्सचं आव्हान दिल्लीच्या टीमने एकंही विकेट न गमावता पार केलंय यावेळी शेफालीने 76 रन्स तर कर्णधार मेग लॅनिंगने 21 रन्स केले. 


दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन


मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, लॉरा हॅरिस, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे, तारा नॉरिस


गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन


सब्भिनेनी मेघना, लॉरा वोल्वार्ड, हरलीन देओल, ऍशलेग गार्डनर, जॉर्जिया वेरेहम, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर