मुंबई : हरियाणा सोनीपतमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपट्टू निशा दहियाची गोळी मारून हत्या केली. अशी बातमी काही मिनिटांत वाऱ्यासारखी व्हायरल झाली. पण ही माहिती चुकीची असून कुस्तीपट्टू निशा दहिया अगदी सुरक्षित आहे. स्वतः निशा दहियाने याबाबत माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'माझ्या हत्येची बातमी चुकीची, मी सुरक्षित', असं म्हणत निशा दहियाने ट्विटरवर एक व्हिडीओ LIVE केला आहे. या व्हिडीओत मी निशा दहिया, गोंडात मी खेळ खेळायला आली आहे. मी अगदी सुरक्षित आहे. ही बातमी फेक आहे. मी अगदी सुरक्षित आहे., अशी माहिती स्वतः निशाने LIVE VIDEO मध्ये दिली आहे. 



पंतप्रधानांनी केलं सकाळीच कौतुक 


 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच सकाळी निशाला ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. निशा आणि इतर कुस्तीपट्टूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल मोदींनी कौतुक केलं होतं. 



 


काय आहे फेक न्यूज 


कुस्तीपट्टू निशा दहियावर बेछुट गोळीबार झाला. यामध्ये निशा दहिया जागीच ठार झाली. तसेच निशाच्या भावावर देखील गोळीबार झाला. त्याने देखील जीव गमावला. या हल्ल्यात आई गंभीर जखमी झाली होती. ही घटना सोनीपतच्या हलालपुर गावात घडली आहे. या ठिकाणी कुस्तीपट्टू सुशील कुमारच्या नावाने ऍकॅडमी आहे. याच ठिकाणी निशावर हल्ला झाला आहे. याच ठिकाणी हल्लेखोराने निशा दहिया, भाऊ सूरज दहिया आणि आई धनपति यांच्यावर अंधाधुंद हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळ्या झाडून तेथून पळ काढला. निशा आणि तिचा भाऊ सुरज यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आईला रोहतकमधील पीजीआय रूग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची परिस्थिती गंभीर आहे.