मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल धोनी आपल्या फलंदाजीसाठी तर जगभर प्रसिद्ध आहे. पण एक उत्तम कर्णधार म्हणून त्याचं नाव मोठं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 18 ते 22 जून हा सामना होणार आहे. धोनी सोबतच्या नात्याबद्दल कोहलीनं खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली सध्या मुंबईतील हॉटेलच्या रूममध्ये क्वारंटाइन आहे. यादरम्यान त्याने आपल्या चाहत्यांशी संवाद साधला त्यावेळी एकाने कॅप्टन कूल धोनीसोबत तुझं नातं कसं आहे. त्याबाबत 2 शब्दात कसं सांगशील असं विचारल्यानंतर विराटनं खूपच सुंदर उत्तर दिलं आहे.


विराटने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दोन शब्द लिहिले जे फार महत्त्वाचे वाटले आणि त्याने आपल्या उत्तरानं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. विराट म्हणाला, 'विश्वास, आदर' कॅप्टन कूल धोनीसोबत माझ्या नात्याबद्दल बोलायतं झालं तर हे दोन शब्द अगदी चपखलपणे बसतात असं कोहली म्हणाला. 



विराट कोहलीने 18 ऑगस्ट 2008 रोजी श्रीलंकेविरूद्ध एमएस धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. माहीने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कप 2019 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार कोहली होता.  कोहलीचं चिकू हे नाव संपूर्ण जगाला माहीमुळे समजलं होतं. तर मैदानात कोहली कर्णधार असताना अडेल तिथे महेंद्रसिंह धोनी त्याला मदत करत होता.