टीम इंडियातील या खेळाडूला मुरलीधरन यांचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी
सर्वात जास्त विकेट्स घेण्यात मुरलीधरन यांच्याशिवाय आणखी कोण खेळाडू आहेत पाहा
मुंबई: टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आहे. हा सामना न्यूझीलंड विरुद्ध ड्युक बॉलने खेळला जाणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची सीरिज देखील खेळली जाणार आहे. टीम इंडियातील एका खेळाडूला श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे कोच मुरली मुथय्या यांचा रेकॉर्ड तोडण्याची सुवर्णसंधी आहे. या खेळाडूकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे.
IPL 2021मध्ये कुंटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर आर अश्विननं ब्रेक घेतला होता. आता आर अश्विनचे कुटुंबीय या परिस्थितीतून बाहेर आले असून तो सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. इंग्लंड दौऱ्यादरम्यान त्याला मुरलीधरन यांचा कसोटी सामन्यातील विकेट्सचा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे.
भारताचा रविचंद्रन अश्विन मुरलीधरन यांचा विक्रम मोडू शकतो. अश्विनने 78 कसोटी सामन्यांत 409 विकेट्स घेतल्या असून मुरलीधरन यांच्या 800 कसोटी विकेटपेक्षा 391 विकेट्सने अश्विन मागे आहे. ब्रॅड हॉग असं म्हणाले की, 'अश्विन 34 वर्षांचा आहे आणि मला वाटतं की तो वयाच्या 42 व्या वर्षापर्यंत कसोटी खेळू शकतो. त्याची फलंदाजी कमी होऊ शकते परंतु गोलंदाजीत तो दिवसेंदिवस उदयास येत आहे. तो किमान 600 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेईल. त्याच्याकडे मुरलीधरन यांचा रेकॉर्ड मोडण्याची एक सुवर्णसंधी आहे.'
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम माजी श्रीलंकेचे स्पिनर गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरन यांनी 133 कसोटी सामने खेळून 800 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर गोलंदाज शेन वॉर्न सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत तिसर्या क्रमांकावर भारताचा दिग्गज स्पिनक अनिल कुंबळे असून त्यांच्या नावावर 619 विकेट आहेत. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अॅन्डरसन याक्षणी खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये आघाडीवर आहे. ज्यांनी आतापर्यंत 614 विकेट्स घेतल्या आहेत.
आतापर्यंतचा रेकॉर्ड
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - सामने 133 विकेट्स 800
शेन वार्न (ऑस्ट्रेलिया) - सामने 145 विकेट्स 708
अनिल कुंबळे (भारत) - सामने 132 विकेट्स 619
जिमी एन्डरसन (इंग्लंड) - सामने 160 विकेट्स 614
ग्लॅन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया)- सामने 124 विकेट्स 563