WTC 2021 फायनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या ड्युक बॉलचं वैशिष्ट्यं काय?
ड्युक, कुकाबुरा आणि SG या तिन्ही बॉलमध्ये काय फरक?
मुंबई: टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तयारी करत आहे. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्यामध्ये ड्युक बॉलचा वापर करण्यात येणार आहे. या निमित्तानं ड्युक, ड्युक, कूकाबुरा आणि SG या तिन्ही बॉलमध्ये काय फरक आहे आणि या ड्युक बॉलचं वैशिष्ट्यं काय आहे हे जाणून घेऊया.
कुकाबुरा बॉल
कुकाबुरा कंपनीचे बॉल हे ऑस्ट्रेलियामध्ये तयार केले जातात. याचा वापर ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या सामन्यांमध्ये केला जातो. यामध्ये लो सीम असते. ज्यामुळे पहिले 20 ओव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल स्विंग होतो. मात्र त्यानंतर गोलंदाजांना ह्या बॉलनं बॉलिंग करणं कठीण होत जातं याचं कारण म्हणजे स्पिनर्सला हवी तशी ग्रीप या बॉलमध्ये 20 ओव्हर्सनंतर मिळणं कठीण होऊ लागतं.
ड्युक बॉल
हा बॉल इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वापरला जातो. हा एक बॉल साधारण 50 ते 55 ओव्हर्सपर्यंत चांगला चालतो. वेगवाग गोलंदाजांसाठी हा सर्वोत्तम बॉल मानला जातो. याच बॉलनं टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे.
SG बॉल
एसजी बॉलमध्ये शिवण वेगळ्या पद्धतीनं तयार केलेली असते. हा बॉल भारतात तयार केला जातो आणि कसोटी सामन्यांमध्ये वापरला जातो. परंतु भारतीय खेळपट्टीचा विचार करता हा बहॉल 10 ते 20 ओव्हरपर्यंतच चांगला टिकू शकतो. त्यानंतर रिव्हर्स स्विंग करण्यासाठी हा बॉल चांगला आहे. त्यामुळे स्पिनर्सना मोठी मदत होते. फिरतो आणि त्याचा चमक कमी होतो. सर्व एसजी बॉलच्या आकारात थोडा फरक असतो.