लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship) 2021-23 ची फायनल मॅच द ओवल मैदानावर होणार आहे. यानंतर 2023-2025 चॅम्पियनशिपची फायनल देखील इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. आयसीसीने देखील याचा दुजोरा दिला आहे. आतापर्यंत टेस्ट चॅम्पियनशिपच्या सर्व सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्येच झाले आहे. टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना देखील इंग्लंडमध्येच खेळला गेला होता. भारत आणि न्यूझीलंडमध्ये हा सामना झाला होता. साउथैंपटनच्या बाउल स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला होता. (ICC test championship final)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने आपल्या वक्तव्यात म्हटले की, "इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल पुष्टी करतो की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल 2023 मध्ये लंडन आणि 2025 मध्ये लॉर्ड्स येथे होईल.'


आयसीसीचे प्रमुख ज्योफ एलारडिस यांनी म्हटले की, "आम्ही ओवलमध्ये पुढच्या वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचं आयोजन करणार आहोत. 2025 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल रंगणार आहे.'


“गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील साउथहॅम्प्टनमध्ये झालेली फायनल खूपच रोमांचक होती आणि मला खात्री आहे की जगभरातील चाहते ओव्हलवर होणाऱ्या पुढच्या फायनलची वाट पाहत असतील. आयसीसीच्या वतीने, मला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेटचे आभार मानताना आनंद होत आहे.'


2021 मध्ये भारताचा पराभव करून न्यूझीलंडचा संघ पहिला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनला होता.