WTC Final 2023 : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना खेळवण्यात येतोय. हा सामना टीम इंडियाच्या ( Team India ) एका खेळाडूसाठी फार खास आहे. हा खेळाडू म्हणजे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) . अजिंक्य तब्बल 18 महिन्यांनी टीम इंडियामध्ये ( Team India ) कमबॅक करतोय. अशातच रहाणेचा सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media ) चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडालीये. 


रहाणेवर लागला नियम तोडण्याचा आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) मैदानावर असं कृत्य केलं की, ज्यामुळे त्याच्यावर ICC नियम मोडल्याचा आरोप करण्यात येतोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे त्यांच्या दोन्ही हातांवर थुंकताना दिसतोय. दरम्यान हातावर थुंकणं हे नियमांच्या विरोधात नाहीये.


मात्र अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे, अजिंक्य रहाणेने जर थुंकल्यानंतर बॉल उचलला तर बॉलला शाईन येईल. असं झाल्यास आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. यामुळे रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात येतेय. 


आयसीसीचा ( ICC ) नियम काय सांगतो?


आयसीसीच्या ( ICC ) नियमानुसार, थुंकीने बॉल चमकवण्यावर पूर्णपणे बंदी आहे. जर सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू असं करत असेल तर त्या खेळाडूवर कठोर कारवाई केली जाऊ शकतो. मात्र एकंदरीत पाहता अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) दोषी नाहीये, मात्र तरीही, ICC चा नियम विसरला का, असा सवाल करण्यात येतोय. 


कमबॅकवर काय म्हणाला रहाणे?


अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) 18 महिन्यांनी टीम इंडियामध्ये कबमॅक करतोय. सामना सुरु होण्यापूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये रहाणे म्हणाला होता की, ज्यावेळी मला टीममधून ड्रॉप करण्यात आलं होतं, त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला भरपूर पाठिंबा दिला. भारतासाठी खेळण्याच्या स्वप्नाला मी नेहमीच जिवंत ठेवलं होतं. भारतासाठी खेळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं असल्याचं मी माझ्या कुटुंबाला सांगितलं होतं. सध्या मी माझ्या फलंदाजीवर फोकस करतोय. टीममध्ये परतणं हे माझ्यासाठी खूप खास आहे.